Tarun Bharat

नऊ वर्षाची ज्ञानेश्वरी चालवतेय टेम्पो

भाजी विक्रेत्या आई-वडिलांना करतेय मदत    

प्रतिनिधी / सातारा : 

अगदी लहान वयात ड्रायव्हिंग शिकणे तसे अवघडचं. मात्र, साताऱ्यातील शाहुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी तुकाराम कोकरे हिने ही कला सहज आत्मसात केलीय. ज्ञानेश्वरीने लॉकडाऊन काळात भाजी विक्रेत्या आईवडिलांना मदत करताना वडिलांचे ड्रायव्हिंग पाहून मागील वर्षी ती छोटा हत्ती चालवण्यास शिकली. ती आता सफाईदारपणे गाडी चालवत असून, तिचे  सातारा शहरातून कौतुक होत आहे.    

मराठय़ांच्या राजधानीत अनेक विक्रम घडणारे अवलिया आहेत. साताऱ्यात नव्यानेच उजेडात आलेले सत्य म्हणजे नऊ वर्षाच्या चिरमुडीचे छोटा हत्ती चालवण्याचे धाडस. ज्ञानेश्वरी कोकरे गतवर्षी लॉकडाऊनमध्ये घरचा छोटा हत्ती चालवण्यास शिकली. तिचे वडिल तुकाराम कोकरे आणि आई राजश्री हे दोघे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. लॉकडाऊन काळात भाजीपाल्याचा व्यवसाय करत असताना तीने आपली ऑनलाईन शाळा बघत त्यांना मदत केली. कोकरे कुटुंबियांचे मुळ गाव सातारा तालुक्मयातील पळसावडे हे आहे. ज्ञानेश्वरी ही शाळेतही हुशार आहे. तिचा आवडीचा विषय, गणित अन् इंग्रजी आहे.   

व्हिडीओमुळे झाली वडिलांवर कारवाई  

ज्ञानेश्वरी हिने गाडी चालवायला शिकली असली तरीही तिच्या हातात स्टेअरिंग तिचे वडिल देत नाहीत. वडिलांनी सांगितले तरच ती स्टेअरिंगवर बसते. रविवारी राजवाडा येथे गाडी वळवून लाव, अशी वडिलांची आज्ञा होताच तिच्या एका नातेवाईकास त्याचे कुतूहूल वाटले अन् त्यांनी तो व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ फेसबुकवर अपलोड झाल्यानंतर शाहुपूरी पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून तिच्या वडिलांवर लहान मुलीने गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई केली.

Related Stories

पै.अमोल साठे यांच्या मलकापूर येथील घरात चोरी

Patil_p

पावसाळी अधिवेशनात सातारी बाणा

Patil_p

अवैध दारू विक्री करणाऱ्या चौघांवर गुन्हा

datta jadhav

सातारा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, 106 नवे कोरोना बाधित

Archana Banage

कृष्णा कारखान्यावर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Archana Banage

सलग आठव्या दिवशी बाधित वाढ 30 च्या खाली

datta jadhav