Tarun Bharat

नक्षत्र कॉलनी येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

बंद असलेल्या घरांचे दरवाजे फोडून घरातील किमती ऐवज लांबवण्याचे घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. नक्षत्र कॉलनी येथे रविवारी सकाळी असाच एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. नक्षत्र कॉलनी येथील रहिवासी असणाऱ्या एंजल अल्मेडा यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे घर मालक काही कामानिमित्त मागील पंधरा दिवसांपूर्वी गावाला गेले होते . त्यामुळे हे घर बंद होते. चोरट्यांनी पाळत ठेवून चोरीचा हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे रविवारी सकाळी घरातील सदस्य परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.नेमका किती ऐवज चोरीस गेला याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.

Related Stories

चीनमध्ये कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचेही संकट?

prashant_c

ट्रक-दुचाकी अपघातात दोघे ठार

Patil_p

लॉकडाऊनच्या काळातही लोकमान्यची रुग्णसेवा

Patil_p

बेळवट्टीतील आंबेडकर गल्लीतील रस्ते, गटारी, पाणी समस्या सोडवा

Amit Kulkarni

खासबागच्या बाजारात मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

Amit Kulkarni

बेंगळूर : शशिकला यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!