Tarun Bharat

नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक गडचिरोलीत शहीद

Advertisements

प्रतिनिधी / पंढरपूर

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड पोयराकोटी येथील जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे शहीद झाले. होनमाने हे पंढरपूर तालुक्यातील पुळुज येथील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की , तालुक्यातील पुळुज गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक धनजी होनमाने हे गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली येथे क्यूआरटी या विशेष पथकामध्ये सेवेत होते. रविवारी सकाळी सहा वाजता भामरागड परिसरातील पोयरीकोटी- कोपर्शी या जंगल परिसरामध्ये पोलीस आणि नक्षल यांच्यात चकमक झाली. या चकमकीत होनमाने आणि त्यांचे पथक नक्षलवाद्यांशी सामना करत होते. यामध्ये होनमाने यांच्यासह एक पोलीस शिपाई देखील शहीद झाले.

पोलीस आणि नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि त्यांच्या पथकाने चार ते पाच नक्षलवाद्यांना ठार केले असल्याचे वृत्त आहे. याबाबत गडचिरोलीच्या पोलिस अधीक्षकांनी तसा खुलासा देखील केला आहे. तसेच या चकमकीनंतर जंगल परिसरातील नक्षलविरोधी अभियान पोलिसांकडून तीव्र करण्यात आले आहे.

शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचे प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण पुळुज येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय झाले. उच्च शिक्षणासाठी ते पुणे येथे गेले होते. तर साधारण साडेतीन वर्षांपूर्वी ते पोलीस खात्यात भरती झाले. नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल होनमाने यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देखील जाहीर झाले होते. सदरचे वृत्त पंढरपूर तालुक्यातील पुळुज याठिकाणी समजतात. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.


एका महिन्यावर होता लग्नाचा मुहूर्त….
पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांचा पुढील महिन्यात विवाह होता. यासाठी गडचिरोली येथील सेवेतून ते लवकरच सुट्टी घेऊन विवाह करता आपल्या स्वगृही परतणार होते. लग्नसोहळ्याची स्वप्ने पहात असताना त्यांना मायभूमिसाठी हौतात्म्य पत्करावे लागले.

Related Stories

शिवाजी कॉलेजला 1 कोटी 89 लाखाचा पुरस्कार

Abhijeet Shinde

Solapur; पोलिस ठाण्यातून धूम ठोकलेला आरोपी सापडला पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar

३३ वासारांसह सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

बायपास पुलाला युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत

Sumit Tambekar

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंचीही हत्या होऊ शकते’

Abhijeet Shinde

शहीद पोलिस उपनिरिक्षक होनमाने अनंतात विलिन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!