Tarun Bharat

नक्षली हल्ल्यात 17 जवान हुतात्मा

छत्तीसगडच्या सुकमामध्ये चकमक; 14 जवान जखमी

वृत्तसंस्था / रायपूर

छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 17 जवान हुतात्मा झाले आहेत. नक्षलवाद्यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास सुकमा येथील चिंतागुफा पोलीस चौकी परिसरातील कासलपद आणि मिंपा दरम्यान सुरक्षा दलावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर 17 जवान बेपत्ता झाले होते तर 14 जवान जखमी झाले असून, त्यांना शनिवारी रात्री उशिरा रायपूरच्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेपत्ता असलेले 17 जवान हुतात्मा झाले असून, त्यांचे पार्थिव जंगलातून शोध पथकाद्वारे बाहेर काढण्यात आले आहेत. या चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुंदरराज पी. यांनी रविवारी दिली.

चकमकीदरम्यान बेपत्ता झालेल्या 14 जवानांचे मृतदेह 20 तासानंतर रविवारी सापडले असून, तीन जवान शनिवारी हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवानांपैकी 12 जवान डीआरजीचे तर पाच एसटीएफचे आहेत. चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी जवानांची एके-47 सह 16 हत्यारे लुटून नेली आहेत. यावर्षीचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.

नक्षलवाद्यांना अगोदरच मोहिमेची माहिती

कसालपाड परिसरात मोठय़ा प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर डीआरजी, एसटीएफ आणि कोब्राचे सुमारे 600 जवान दोरनापालवरून रवाना झाले. नक्षलवाद्यांना विशेष मोहिमेमध्ये अडकविण्याचा जवानांचा प्रयत्न होता. मात्र, नक्षलवाद्यांना अगोदरच याची माहिती मिळाली होती. नक्षलवाद्यांनी रणनीती आखून जवानांना राजगुडा गावच्या जंगलात येऊ दिले आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला.

Related Stories

गोवा बनतोय आयपीएल सट्टा अड्डा

Omkar B

नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

Patil_p

रेल्वेत पुन्हा सुरू होणार गरमागरम ‘खान-पान’

Patil_p

श्रीलंकेला भारताकडून 23 हजार कोटींची मदत

Patil_p

बिल गेट्स, ओबामांचे ट्विटर खाते हॅक

Patil_p

मराठा आरक्षणाला स्थगिती

Patil_p