Tarun Bharat

नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद

प्रतिनिधी/ नागपूर

नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (30) व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस ठाण्यांतर्गत आलदंडी-गुंडुरवाही गावानजीकच्या जंगलात रविवारी सकाळी ही चकमक झाली. या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल व सी 60 पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंग स्फोट घडवून लगेच गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली व दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. तर तिन्ही जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गोंगलू ओक्सा व दसरु कुरचामी या जवानांना नागपूरला हलविण्यात आले आहे.

शहीद धनाजी होनमाने हे पंढरपूर जिह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही दिवसांपूर्वीच शहीद होनमाने यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत.

Related Stories

विकास साधत कार्यकाळ पूर्ण करणार!

Patil_p

रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी

Patil_p

मिग-21 ची स्क्वाड्रन सेवानिवृत्त करण्याची तयारी

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफला मोठे यश

Patil_p

KCR; राज्ये कमकुवत करण्याचा केंद्र सरकारचा कट : केसीआर यांचा भाजपवर हल्लाबोल

Abhijeet Khandekar

बीएसएफकडून पाकिस्तान रेंजर्सना मिठाई प्रदान

Patil_p