Tarun Bharat

नगणतीबाबत चित्र अद्याप अस्पष्ट

सोशल मीडियावरील संदेशामुळे संभ्रम : केवळ चर्चा; अधिकृत आदेश नाही

प्रतिनिधी / बेळगाव

गतवर्षी जनगणती होणार होती. मात्र मार्च महिन्यात आलेल्या कोरोना संकटामुळे संपूर्ण वाटचाल ठप्प झाली. परिणामी शिक्षकांना सुटीत करावी लागणारी जनगणतीची डय़ुटी थांबली. मात्र 2020-2021 या शैक्षणिक वर्षात जनगणती होणार असल्याचे संदेश सध्या व्हॉट्सऍपवर फिरत असून यामुळे गतवर्षी थांबलेली जनगणती एप्रिल-मे महिन्यात करावी लागणार की काय, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने कोणताच आदेश देण्यात आला नसून कोरोना, शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक यावर जनगणती होणार की नाही, हे ठरणार असल्याचे सांगितले आहे.

2020 च्या ऊन्हाळी सुटीत शिक्षकांसाठी जनगणतीचे आदेश देण्यात आले होते. यामुळे शिक्षकांसमोर जनगणतीचे आव्हान होते. यादृष्टिकोनातून शिक्षकांना प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या संकटात जनगणती देखील रखडली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याखेरीज जनगणती होणार नाही, हे जरी स्पष्ट असले तरी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया संदेशामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

जनगणतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. शिवाय घरोघरी जाऊन कराव्या लागणाऱया जनगणतीमुळे शिक्षकांची संपूर्ण सुटी कामात जाते. मात्र यंदा उशिरा सुरू झालेली विद्यागम योजना शिवाय इ. 1 ली ते 5 वीबाबत अजून कोणतेच चित्र स्पष्ट नसल्याने यंदा उन्हाळी सुटी आहे की नाही, याविषयी देखील शिक्षण विभागाने कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. परिणामी जनगणतीविषयी चर्चा असली तरी याबाबत अधिकृत आदेश मात्र नाही.

Related Stories

सदाशिवनगर येथे पाऊण लाखाची घरफोडी

Omkar B

ग्रामीण भागातही भाजपचा झंझावती प्रचार सुरू

Amit Kulkarni

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 12 ऑक्टोबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

जमखंडीत सिद्दू न्यामगौड यांना अभिवादन

Patil_p

सिव्हिलमध्ये 20 जण आयसीयुमध्ये

Patil_p

कालमणी येथे शेतात आढळले ट्रकभर गोमांस

Patil_p