Tarun Bharat

नगरपालिका शिक्षण मंडळ सेवक सहकारी संस्थेतर्फे लाभांश जाहीर

प्रतिनिधी/ सातारा

  सातारा नगरपालिका शिक्षण मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेची 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अमोल गिरी गोसावी यांचे अध्यक्षते खाली  नुकतीच पार पाडली. यावेळी त्यांनी सभासदांना 9 टक्के लाभांश देण्याची जाहीर केले. याप्रसंगी व्हाइस चेअरमन दुर्गादेवी गोरे, माजी चेअरमन संचालक संतोष खेडकर, कविता बनसोडे, उज्वला गाडे, रक्षंदा बागवान, जयश्री जाधव, संगीता दिरांगणे, माधूरी खूर्द, उत्तमराव इंगळे अकौटंन्ट चंद्रहास झांजुर्णे व संस्थेचे सचिव अनिल मेढेकर, आजी माजी पदाधिकारी, प्रशासन अधिकारी मारुती भांगे, प्रमुख पाहुणे डॉ प्रविण कुलकर्णी, अजित सांळूखे व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.

 यावेळी संस्थेच्या वार्षीक उलाढालीची माहिती देण्यात आली. तसेच संस्थेच्या उत्तम कारभाराबददल अभिनंदनाचा ठराव घेणेत आला. यानंतर गुणवंत सभासद पाल्यांचा सत्कार व आदर्श शिक्षक, शाळा यांचा सन्मान स्मृतीचिन्ह देवून डॉ प्रविण कुलकर्णी, प्रशासन अधिकारी भांगे, जनता बँकेचे संचालक अजित सांळूखे व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला या सभेस बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष खेडकर, अहवाल वाचन सचिव मेढेकर, आभार गोरे यांनी मानले.

Related Stories

बेंदूराच्या साणाच्या मुळावर कोरोना

Patil_p

बँकेच्या घोटाळाप्रकरणी सुरुवातीला सोळा आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

Patil_p

हरणाईदेवीचा अष्टमीउत्सव साधेपणाने

Archana Banage

वाईतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

जिल्हय़ात दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

Patil_p

वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याचे होणार चौपदरीकरण

Patil_p