Tarun Bharat

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी कोल्हापुरात

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार 8 रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. यावेळी ते महापालिका निवडणुकी संदर्भात पदाधिकार्‍यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सायंकाळी 7 वाजता शहर शिवसेना कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

बृहन्मुंबई महापालिकेचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व महापालिका, नगरपालिका, प्रादेशिक नगररचना आदी क्षेत्रांकरीता एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली संपूर्ण राज्यात लागू केला. निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार असून व्यवसायिकांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल त्यांचा शनिवार पेठेतील शिवसेना शहर कार्यालयामध्ये सायंकाळी 7 वाजता सत्कार करण्यात येणार आहे. दिवसभर ते सार्वजनिक बांधकाम, नगरविकास विभागातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेवून विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहेत.

Related Stories

शिरढोण जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

साताऱयाला पोलीस छावणीचे स्वरुप

Patil_p

राज्यात पुढील ४ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज

Archana Banage

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Archana Banage

लग्नाच्या आमिषाने पोलीस कॉन्स्टेबलचा अत्याचार, गुन्हा दाखल

Archana Banage

प्रियेसीला भेटायला गेलेल्या प्रियकरचा विहीरीत पडून मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!