Tarun Bharat

नटराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ

प्रतिनिधी/ सातारा

श्री कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र  सरस्वती महास्वामी तसेच याच पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान शंकराचार्य पीठापती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या पूर्ण अनुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि. 27 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 1 मार्च या कालावधीत रुद्र, संगीत आणि नृत्यांजली सेवा होणार आहे

 सोमवार दि. 28 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत लघुरुद्र, जप व क्रमार्चना संपन्न होणार आहे. दि. 1 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत महाशिवरात्री निमित्त लघु न्यास, एकादशरुद्र जप, लघुरुद्र होम व पूर्णाहुती होऊन महामंगलारती तसेच कलश यात्रा होणार आहे. या वेळी श्री मुलनाथेश्वर पिंडीस कलश महाभिषेक, अलंकार, नैवेद्य आरती आणि प्रसाद वितरण होणार आहे. रात्री आठ ते अकरा या वेळेत महाशिवरात्रीनिमित्त कलश स्थापना तसेच लघुरुद्र जप आणि नटराज पिंडीला अभिषेक केला जाणार आहे. महाशिवरात्री महोत्सवातील यावर्षीच्या संगीत आणि नृत्यांजली सेवेचा कार्यक्रमात दिनांक 28 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सातारा येथील सुप्रसिद्ध युवा कलाकार यश कोल्हापुरे यांचे हिंदुस्तानी संगीत गायन होणार आहे. मंगळवारी 1 मार्च रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत सातारा येथील गुरु कै. डॉ. साधना जोशी यांच्या स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या शिष्य शास्त्राrय व उपशास्त्राrय गायन सादर करणार आहेत. नटराज मंदिरात सकाळी 6 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते रात्री 12 या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापन समितीने दिली आहे.

Related Stories

सातारा : अकरावी प्रवेशावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळा अन्यथा कारवाई

Archana Banage

मैत्रीदिन एकमेकांना शुभेच्छा देत साजरा

Patil_p

सातारा : खेड ग्रामपंचायत परिसरात विठ्ठल कृपा कॉलनीतील रस्त्याची चोरी

Archana Banage

पीएफएमएस प्रणालीद्वारे विकास निधी वितरण होणार

Patil_p

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनला कडकचा मुलामा

datta jadhav

नियम पाळूनच दीपावली साजरी करा

Patil_p