Tarun Bharat

‘नटसम्राट’ स्वगत सादरीकरण स्पर्धेत बेळगावचे कलाकार चमकले

Advertisements

बेळगावचा सोहम शहापूरकर ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

प्रतिनिधी / बेळगाव

नाशिकच्या कुसुमाग्रज विचारमंचतर्फे ‘नटसम्राट’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्वगत सादरीकरण या ऑनलाईन स्पर्धेत बेळगावच्या सोहम संदीप शहापूरकर याने प्रथम व राजसी दीपक गोजगेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना रंगभूमी ग्रुपच्या संचालिका मेधा मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. ‘नटसम्राट’ नाटकातील स्वगत स्पर्धकांना सादर करावयाचे होते.

या स्वगत स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून उत्तम प्रतिसाद मिळाला. कुमार गट आणि खुला गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक फेरीतील पात्र प्रवेशिकांची अंतिम फेरीत निवड करून परीक्षकांचे परीक्षण व प्रेक्षकांचे ऑनलाईन मतदान मंचाच्या वेबसाईटवर व यूटय़ूब चॅनेलवर घेण्यात आले. परीक्षकांचे गुण, प्रेक्षकांची संख्या, श्रेणी, लाईक्स यांचा विचार करून अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली.

जगभरातून प्रेक्षकांनी वेबसाईटवर आणि यूटय़ूबवरून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. परीक्षक म्हणून ज्ये÷ नाटय़ कलावंत उपेंद्र दाते व प्रमोद टेंबे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत बेळगावच्या सोहम व राजसी यांनी उल्लेखनिय यश मिळविले. हे दोघेही रंगभूमी ग्रुपच्या नाटय़ शिबिरात सहभागी होत आले असून स्पर्धेसाठी मेधा मराठे यांनी त्यांची रंगीत तालीम घेतली.

Related Stories

बेंगळूर-जयपूर व्हाया बेळगाव धावणार रेल्वेची पार्सल एक्स्प्रेस

Patil_p

मनपाचा पहिला बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित

Amit Kulkarni

कौल कोणाला?, मतदार राजाच ठरणार किंगमेकर

Omkar B

विजापुरात विविध विकासकामांचे भूमिपूजन

Patil_p

मुरगोड पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्याला अटक

Rohan_P

सुरळीत पाणीपुरवठय़ास दिरंगाई, निम्म्या शहरात पाणीटंचाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!