Tarun Bharat

नड्डा यांची मंत्री, आमदारांशी चर्चा

पणजी प्रतिनिधी ः

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री, पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार यांच्यासोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे श्री. नड्डा यांनी कौतुक केले. पक्षाचे सर्व मंत्री, पदाधिकारी आणि आमदारांनी कोविड काळात केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली आणि अभिनंदनही केले. पक्षांच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेली मदत, लसीकरण मोहिमेची जनजागृती, गोरगरिबांना केलेले अर्थसाहाय्य याबद्दलही श्री. नड्डा यांनी समाधान व्यक्त केले. कोविड महामारी अजूनही संपलेली नाही. देशात व राज्यांत मोठय़ा प्रमाणात लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व मंत्री व आमदार यांनी सजग राहून आपले समाजकार्य यापुढेही असेच सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गेले 12-13 दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांत आणि घरांत पाणी शिरल्याने मोठे आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. आर्थिक नुकसान झालेल्यांना तसेच समस्याग्रस्त लोकांना मदत करा. तसेच विद्यमान परिस्थितीवर लक्ष ठेवा आणि गरजूंना आवश्यक ती मदत करा, अशी सूचना श्री. नड्डा यांनी यावेळी केली. दरम्यान, प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी श्री. नड्डा यांची भेट घेतली. नड्डा यांच्यासमवेत झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीला गावडे उपस्थित होते. त्यामुळे श्री. गावडे हे भाजपमध्ये दाखल होतील, असे संकेत मिळत आहेत.

Related Stories

करमळी रस्त्यावरील चरामध्ये बळी जाण्याची वाट पाहताय?

Amit Kulkarni

गांधी मार्केट परिसरात 21 लाख खर्चून विविध कामे राबविणार

Amit Kulkarni

कोरोना लॉकडाऊनच्या खरेदीसाठी माशेल उसळली गर्दी

Patil_p

पर्वरीत 7.40 लाखांचे हशिश जप्त

Amit Kulkarni

टोनी, दया, करिशेट्टी काँग्रेसमध्ये

Amit Kulkarni

साळजिणी येथील रस्त्याची चाळण, लोक हैराण

Patil_p