Tarun Bharat

नदाल, हॅलेपची आगेकूच, प्लिस्कोव्हा पराभूत

मेलबर्न / वृत्तसंस्था

स्पेनचा राफेल नदाल, जर्मनीचा अलेक्झांडर झेरेव्ह, रशियाचा आंद्रे रुबलेव्ह यांनी पुरुष गटात तर जर्मनीची अँजेलिक्यू केरबर, रशियाची ऍनास्तासिया पॅव्हल्युचेन्कोव्हा, रोमानियाची सिमोना हॅलेप यांनी महिला गटातून ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली. प्लिस्कोव्हाचे आव्हान मात्र यावेळी संपुष्टात आले.

राफेल नदालने आपलाच राष्ट्रीय सहकारी पॅबलो कॅरेनो बुस्टाला 6-1, 6-2, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये नमवत चौथ्या फेरीतील स्थान निश्चित केले. नदालला 2016 नंतर एकदाही स्पेनच्याच खेळाडूकडून एकही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. ही परंपरा त्याने येथे कायम राखली. 4 वर्षांपूर्वी राष्ट्रीय सहकारी फर्नांडो व्हर्डेस्कोने त्याला पराभवाचा धक्का दिला होता. यंदा नदाल येथे विक्रमी 20 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी आहे.

सातव्या मानांकित अलेक्झांडर झेरेव्हने स्पेनच्या व्हर्डेस्कोला येथे 6-2, 6-2, 6-4 असे नमवत आगेकूच केली. झेरेव्हची पुढील लढत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हविरुद्ध होईल. रुबलेव्हने 11 व्या मानांकित डेव्हिड गॉफिनला 2-6, 7-6 (3), 6-4, 7-6 (4) अशा फरकाने पराभूत केले.

महिला गटात अँजेलिक्यू केरबरने कॅमिला जिओर्जीला 6-2, 6-7 (4), 6-3 असे नमवत चौथ्या फेरीतील स्थान निश्चित केले. केरबरने यापूर्वी 2016 मधील या स्पर्धेचे जेतेपद संपादन केले होते. रशियाच्या ऍनास्तायिसाने द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला अखेर सातव्या प्रयत्नात पराभूत करण्यात यश मिळवले. तिने 7-6 (4), 7-6 (3) अशा फरकाने विजय मिळवला. रोमानियाच्या सिमोना हॅलेपने कझाकस्तानच्या यीलया पुतिन्त्सेवाला 6-1, 6-4 असे नमवत चौथ्या फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकित बेलिंडा बेनिसकला कोन्टावेटकडून पराभवाचा धक्का सोसावा लागला. कोन्टावेटने 6-0, 6-1 अशा फरकाने 49 मिनिटातच बाजी मारली.

बोपण्णा-नादिया दुसऱया फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा व त्याची युक्रेनियन सहकारी नादिया किशेनॉक या जोडीने मिश्र दुहेरीच्या दुसऱया फेरीत धडक मारली. या जोडीने शनिवारी झालेल्या सलामीच्या लढतीत ल्यूदिमिला किशेनॉक (युक्रेन)-ऑस्टिन क्रॅजिसेक (अमेरिका) यांना 1 तास 15 मिनिटांच्या लढतीत 7-5, 4-6, 10-6 असे नमवले. बोपण्णा सानियासमवेत उतरणार होता. पण, सानियाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अनुभवी लियांडर पेस या गटात जेलेना ओस्टापेंकोच्या साथीने खेळत आहे. 

जेव्हा किर्गिओसने पंचांना विचारले, Are You Stupid?

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत निक किर्गिओसने रशियाच्या कॅरेन खॅशोनाव्हला पाच सेटसमधील लढतीनंतर मात दिली. पण, चौथ्या सेटदरम्यान किर्गिओसने पंचांना उद्देशून प्रश्न केल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. किर्गिओस त्यावेळी डाईव्ह मारण्याच्या प्रयत्नात कोसळला व उजव्या हाताला रक्तस्राव सुरु झाला. तो टॉवेलने पुसून व बॉल बॉयच्या हाताला ते लागू नये, अशा पद्धतीने टॉवेल गुंडाळून देण्यासाठी त्याला वेळ लागला आणि याचवेळी पंचांनी त्याला जादा वेळ न घेण्याची सूचना केली. वास्तविक, पंचांना त्याला रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले नव्हते. पण, यावरुन किर्गिओसने त्यांच्याकडे पाहत, थेट Are You Stupid असा प्रश्न विचारला व यामुळे कोर्टवर गंभीर वातावरण निर्माण झाले.

Related Stories

बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी स्नेहाशिष गांगुली

Patil_p

चेस ऑलिम्पियाड टॉर्च रिले अमृतसरमध्ये

Patil_p

भारत-व्हिएतनाम फुटबॉल सामना आज

Patil_p

ग्रेग चॅपेलकडून कोहलीची स्तुती

Patil_p

सर्व सदस्यांची चाचणी निगेटिव्ह : चेन्नई सुपरकिंग्सला दिलासा

Patil_p

काळय़ा फिती बांधून बापू नाडकर्णी यांना भारतीय खेळाडूंकडून आदरांजली

Patil_p