Tarun Bharat

नदीवरील पूल गेला वाहून; 65 गावांचा संपर्क तुटला

ढेबेवाडी / प्रतिनिधी : 

ढेबेवाडी नवा रस्ता मार्गावरील मंद्रुळकोळेनजीक असणारा वांग नदीवरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे 65 गावांचा संपर्क तुटला आहे. 

ढेबेवाडी विभागात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वांग नदीवरील खचलेला पूल वाहून गेला. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. यामुळे मंद्रुळकोळे खुर्द मधील कुंभारवाडा, यादववाडी, कदमवाडी, साबळेवाडी, धुळेवाडी यासह अन्य गावांचा संपर्क तुटला आहे. 

दरम्यान, वांग नदीवर नवीन पूल व्हावा, यासाठी या परिसरातील लोकांनी सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार चार वर्षांपूर्वी पुलासाठी 80 लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले होते. मात्र, या पुलाचे काम अद्याप का रखडले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

टपऱया बंद, मटका सुरु

Patil_p

सेनेच्या आंदोलनाला साताऱयात पोलिसांचा ब्रेक

Patil_p

सातारा : नायगावला विकास निधी मिळावा ; मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन सादर !

Archana Banage

खंडणीच्या गुह्यातील एक वनकर्मचारी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात

Patil_p

हाय व्होल्टेजमुळे काळोशीत 35 टिव्ही जळाले

datta jadhav

जिल्हा रुग्णालयात आत्मदहन आंदोलन

Patil_p