Tarun Bharat

नरेंद्र चंचल यांचे दिल्लीत निधन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘चलो बुलावा आया है’ या लोकप्रिय गीताचे गायक आणि भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे शुक्रवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. अशक्तपणा आणि वृद्धापकालीन आजारांमुळे त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. गायक दलेर मेहेंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

अमृतसरच्या नमक हांडी येथे 16 ऑक्टोबर 1940 साली जन्मलेल्या नरेंद्र चंचल यांना अनेक संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये काम मिळाले होते. बॉबी, बेनाम, रोटी कपडा और मकान या चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली होती. त्यांनी गायलेले ‘बॉबी’ चित्रपटातील ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट मेल प्लेबॅक पुरस्कार मिळाला होता. ‘अवतार’ या चित्रपटातील ‘चलो बुलावा आया है’ या गाण्याने त्यांचे नाव अजरामर झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना संसर्गावर गायलेले गाणे सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.

Related Stories

भंवरी देवी हत्येप्रकरणी माजी मंत्र्याला जामीन

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी वकील प्रशांत भूषण दोषी

Tousif Mujawar

ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचा ‘चलो नबन्ना’ मोर्चा ; सुवेंदू अधिकारींनी अटक

Archana Banage

Bharat Bandh : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले ‘हे’ आवाहन

Archana Banage

झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी

Patil_p

आयटीबीपीच्या वीर जवानांना पोलीस पदक

Patil_p