Tarun Bharat

“नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना न घतलेल्या पत्रकार परिषदेवरुन पून्हा लक्ष केले आहे. नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांसमोर यायला घाबरतात अशी टीका काँग्रेस पक्ष बरीच वर्षे करत आहे. यावेळी मात्र केवळ टीका न करता काँग्रेसने आपल्या ट्विटर वरुन तसे अधिकृत ट्विट केले आहे. आणि हा फोटो सद्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या ट्विट मध्ये दोन फोटो ट्वीटमध्ये दिसत असून, पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषद घेत असल्याचा आहे. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेताना असे देण्यात आले आहे. पण हा फोटो आयताकृती असून पुर्णत: काळा आहे. या फोटोत काहीच दिसत नाही. यामुळे मोदी कधी पत्रकार परिषद घेत नाहीत. असंच काँग्रेसला या फोटोतून सुचित करायचं आहे. त्याच बरोबर #BJPFearsRahulGandhi हॅश टॅग देण्यात आला आहे. ज्याच्यावरुन भाजप पक्ष हा राहूल गांधी यांना घाबरतो असं काँग्रेसने म्हटले आहे.

अशा प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी न घतलेल्या पत्रकार परिषदेवरुन काँग्रेसने पुन्हा भाजपच्या वर्मी घाव घालत. भाजपला लक्ष केले आहे. यावर भाजप कसे प्रतिउत्तर देते याकडे काँग्रेस पक्ष भाजप समर्थक आणि सामान्य नागरिक यांचे लक्ष असणार आहे.

Related Stories

इथेनॉलमिश्रित पेट्रोल पुरवठय़ाला प्रारंभ

Patil_p

किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापुरात

Archana Banage

देशात 67 हजार 708 नव्या बाधितांची नोंद

Patil_p

धोका वाढला ! देशात एका दिवसात 3.62 लाख नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

निटच्या परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकले

Patil_p

जप्त केलेली वाहने मिळणार परत

Patil_p