Tarun Bharat

नरेंद्र मोदींचे नेतृत्व ‘विशी’मध्ये!

Advertisements

मुख्यमंत्री-पंतप्रधान पदांवर सलग 20 वर्षे काम : भाजपने दिली केलेल्या 20 मोठया कामांची यादी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्य आणि केंद्र सरकारमधील प्रमुख भूमिकेत आपल्या 20 व्या वर्षात प्रवेश केला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. त्यानंतर आजतागायत गुजरातमध्ये मोदींच्या नावाची जादू प्रथम पाहिली गेली, जी आता संपूर्ण देशात दिसत असून त्यांनी पंतप्रधानपदापर्यंत झेप
घेतली आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राजकारणाच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या मोजक्मया राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपला प्रवास सुरू करत मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान होईपर्यंत सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा चेहरा म्हणून प्रक्षेपित झाले आणि त्याची ओळख देशभर झाली. यामुळे भाजपने बरेच विक्रम पादाक्रांत केले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली मागील दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला मोठे बहुमत मिळालेले आहे. तत्पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांचा करिष्मा देशभर चमकत होता. भाजपने आपल्या अधिकृत ट्वीटरवरून मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या 20 वर्षांच्या कार्यकाळातील मुख्य 20 कामे सांगितली आहेत. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात आहे. काश्मीरमधील कलम 370 असो किंवा अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठीचे योगदान बहुमूल्य आहे. या कार्यामुळे मोदी हे यशस्वी पंतप्रधान व इतिहासातील महान राजकारणी म्हणूनही ओळखले जातील, यात काहीच शंका नाही.

नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्य आणि केंद्र सरकारमधील प्रमुख भूमिकेत आपल्या 20 व्या वर्षात प्रवेश केला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले. त्यानंतर आजतागायत गुजरातमध्ये मोदींच्या नावाची जादू प्रथम पाहिली गेली, जी आता संपूर्ण देशात दिसत असून आता त्यांनी पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतलेली आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राजकारणाच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या मोजक्मया राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपला प्रवास सुरू करत मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान होईपर्यंत सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधानांचा चेहरा म्हणून प्रक्षेपित झाले आणि त्याची ओळख देशभर झाली. यामुळे भाजपने बरेच विक्रम पादाक्रांत केले आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखाली मागील दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला मोठे बहुमत मिळालेले आहे. तत्पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांचा करिष्मा देशभर चमकत होता. भाजपने ट्विटरवरुन मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या 20 वर्षांच्या कार्यकाळातील मुख्य 20 कामे सांगितली आहेत.

2010 : गुजरातचा 50 वर्षाचा इतिहास पुढील 1,000 वर्ष टिकवण्यासाठी 90 किलो ‘टाइम कॅप्सूल’मध्ये शिक्कामोर्तब केले.

2011 : 17 सप्टेंबर 2011 रोजी लाखोंच्या उपस्थितीत सद्भावना मिशन कार्यक्रमाचे आयोजन.

2012 : 26 डिसेंबर 2012 ला चौथ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान.

2013 : 13 सप्टेंबर 2013 रोजी भाजपच्या संसदीय मंडळाकडून मोदींची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नावनिश्चिती.

2014 : 2 मे 2014 रोजी भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथबद्ध.

2015 : 21 जून 2015 रोजी मोदींच्या पुढाकाराने पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

2016 : भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट नोटांविरोधात लढा तीव्र. डिजिटल व्यवहारासाठी बीएचआयएम/यूपीआय लाँच.

2017 : ‘एक देश एक कर’ अर्थात जीएसटी करप्रणाली देशभर लागू.

2018 : जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी राष्ट्राला समर्पित.

2019 : नरेंद्र मोदी सलग दुसऱयांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथबद्ध.

2020 : ऑगस्ट महिन्यात अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी संपन्न.

Related Stories

LET च्या टॉप कमांडरसह दोघांना कंठस्नान

datta jadhav

देशभर कारगिल विजय दिवस साजरा

Patil_p

मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड नको!

Patil_p

ओवैसी अन् केसीआर यांच्याकडून घुसखोरांची होतेय पाठराखण

Omkar B

जम्मू काश्मीरमध्ये 696 नवे कोरोना रुग्ण; 9 मृत्यू

Tousif Mujawar

माजी आमदार जस्सी खंगूडा यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p
error: Content is protected !!