Tarun Bharat

नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तक मागे : प्रकाश जावडेकर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे पुस्तक मागे घेतल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जयभगवान गोयल यांनी लिहलेले आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रकाशन झाल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. यावर आज रात्री उशिरा जावडेकर यांनी ट्वीट करून पुस्तक मागे घेतले असून वाद संपला आहे, असे म्हटलंय.

यावेळी बोलताना जावडेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांचा भाजपशी काहीही संबंध नाही. त्यांनी येऊन माफी मागितली असून पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी हा वाद संपतो. प्रकाशन होईपर्यंत आम्हाला हे पुस्तक काय आहे, हे आम्हाला माहीत नव्हते, असेही जावडेकरांनी म्हटले आहे.

Related Stories

… यासाठी सोनिया गांधींनी घेतला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Tousif Mujawar

अंडर 17 वर्ल्डकपचे आयोजन निश्चित करा

Patil_p

न्यूयॉर्कमधील ‘जनरल अटलांटिक’ कंपनीची ‘जिओ’ मध्ये 6,600 कोटींची गुंतवणूक

Tousif Mujawar

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीस कोलकातामधून अटक

Tousif Mujawar

टेटे संघाच्या सराव दौऱयाला शासनाची मान्यता

Patil_p

विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून

Patil_p