Tarun Bharat

नरेगा योजनेंतर्गत नंदिहळ्ळी, नागेनहट्टीत कामे सुरू

वार्ताहर /धामणे

नंदीहळ्ळी ग्राम पंचायतच्यावतीने नरेगा योजनेंतर्गत कामाला आता जोर आला असून नंदिहळ्ळी आणि नागेनहट्टी येथे कामे सुरू करण्यात आली आहेत. नंदिहळ्ळी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात नंदिहळ्ळी आणि नागेनहट्टी ही दोन गावे येतात. तर नंदिहळ्ळी ग्रा. पंचायतवतीने नरेगा योजनेंतर्गत नागेनहट्टी गावात 32 लाख 73 हजार रुपयांची कामे सुरू आहेत. यामध्ये शाळेच्या स्वयंपाक खोलीसाठी 9 लाख रुपये, शौचालयासाठी 3 लाख रुपये, शाळेच्या कंपाऊंडसाठी 9 लाख रुपये, प्रार्थना हॉलसाठी 5 लाख रुपये, शाळेचे मैदान नव्याने तयार करण्यासाठी 2 लाख 18 हजार रुपये आणि नागेनहट्टी गावच्या स्मशानभूमीसाठी कंपाऊंड आणि स्मशानभूमी सपाटीकरण आदी कामांसाठी 4 लाख 55 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यापैकी शाळेच्या स्वयंपाक खोलीचे काम सुरू असून नंदिहळ्ळी येथील शाळेच्या विविध कामांसाठी 25 लाख रुपयांच्या निधीला ग्राम पंचायतीने मंजुरी दिली आहे. शाळेच्या स्वयंपाक खोलीसाठी 15 लाख रुपये, कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी 3 लाख आणि शौचालयासाठी 5 लाख रु. खर्च करण्यात येणार आहेत. यातील शाळेच्या स्वयंपाक खोलीचे काम जोमात सुरू असून कालवा खोदाईची कामे सुरू आहेत. रोजगारासाठी 150 कामगार काम करीत असल्याची माहिती ग्रा. पं. सूत्रांनी दिली आहे.

Related Stories

अडचणीत आलेल्या खेळणीवाल्यांना मदतीचा हात

Patil_p

विजया अकादमी अ, जानोपँथर, टॅलेंट स्पोर्ट्स विजयी

Amit Kulkarni

सांडपाण्याच्या निचऱयासाठी आवश्यक उपाययोजना सुरू

Amit Kulkarni

इमारत बांधकाम परवानगीचे कामकाज चार दिवस ठप्प

Amit Kulkarni

शेतकऱयांनी उचगाव ग्राम पंचायतीला ठोकले टाळे

Patil_p

मुचंडीच्या शेतकऱ्यांनी मांडले म्हणणे आम्ही जमीन देणार नाही, रिंगरोड रद्द करा

Patil_p