Tarun Bharat

नर्सिंग विद्यार्थ्यांना विद्याश्री वेतन द्या

Advertisements

अभाविपचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

बेळगाव : नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना विद्याश्री विद्यार्थी वेतन दिले जाते. मात्र 2019-20 मध्ये कोरोनाचे कारण पुढे करून वेतन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना मोठय़ा समस्या भेडसावत आहेत. तेंव्हा तातडीने ते वेतन द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नर्सिंग शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेत असतात. गरीब कुटुंबातून हे विद्यार्थी येथे येतात. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येत आहेत. दरवषी विद्याश्री विद्यार्थी वेतन दिले जाते. मात्र ते वेतन यावषी देण्यात आले नाही. त्यामुळे अन्याय झाला असून विद्यार्थ्यांना जीवन जगणे कठीण बनले आहे. तेंव्हा विद्याश्री वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Related Stories

कणबर्गीतील छकडी गाडीमार्ग खुला करण्याची मागणी

Amit Kulkarni

स्विटमार्ट – बेकरी पदार्थांवर एक्स्पायरी डेट नाही

Patil_p

कणबर्गीत 18 एप्रिलला भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

पुरामुळे नुकसान झालेल्या वकिलांना मदत

Patil_p

गणेश दूध संकलन केंद्राचे कार्य कौतुकास्पद

Patil_p

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 62 लाख 55 हजार रुपये जप्त

Patil_p
error: Content is protected !!