Tarun Bharat

नळाच्या पाण्यात प्लास्टिकचे सुक्ष्म कण

Advertisements

एनआयओच्या डॉ.महुआ साहा यांची माहिती : राज्यातील पाणी प्रकल्पातील नमुन्यांचे सर्वेक्षण

प्रतिनिधी /पणजी

गोव्यातील नळातून पुरवल्या जाणाऱया पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे सुक्ष्म कण आढळून आल्याची माहिती एनआयओच्या शास्त्रज्ञ डॉ. महुआ साहा यांनी दिली आहे. साळावली, ओपा, अस्नोडा, काणकोण या पाणी प्रकल्पातील नमुने घेऊन सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

डॉ. साहा यांनी सांगितले की, गोवा राज्यातील म्हापसा, पणजी, मडगाव आदी प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणाऱया पणी प्रकल्पांना भेटी देऊन तेथे पाहणी करून हे अनुमान काढण्यात आले आहेत. विविध शहरात, गावात पाण्याचे नमुने घेण्यात आले. तेथे एक लिटर पाण्याचे नमुने घेऊन त्यांची सुक्ष्म तपासणी केली.

काळा व निळा या दोन्ही रंगाचे सुक्ष्म कणही आढळून आले असून पाणी पुरवठा यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे लोखंडी, प्लास्टिक पाईप, रंग याचा परिणाम होऊन त्याचे कण पाण्यात मिसळतात असा दावा त्यांनी केला आहे. पाण्याचे पाईप, त्यांचे गजणे, खराब होणे या प्रकारामुळे पाण्यात त्याचे सुक्ष्म कण मिसळतात, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

प्रतिलीटर पाण्यामध्ये सापडलेले प्लास्टिक

  • माशेल – 9 मायक्रो
  • काणकोण – 8 मायक्रो
  • मडगाव – 6.4 मायक्रो
  • पणजी – 6.2 मायक्रो

Related Stories

मच्छिमार होडय़ांचे मोटर चोरल्याप्रकरणी पेडणे पोलिसांची संदेश चोडणकर याला अटक

Amit Kulkarni

आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

Amit Kulkarni

म्हापशात भिंतीला भोक पाडून 3.20 लाखाची चांदी पळवली

Amit Kulkarni

राज्यभरातील पोलीस यंत्रणा सज्ज

Patil_p

वादळामुळे राज्यात तब्बल 40 कोटींचे नुकसान

Amit Kulkarni

गोवा महाराष्ट्र सीमेवर कडक पहारा ठेवा : मुख्यमंत्री

Omkar B
error: Content is protected !!