Tarun Bharat

नवज्योत सिद्धू पंजाबची राखी सावंत !

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँगेस नेते नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबची राखी सावंत आहेत, असे विधान आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा यग्नांनी केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मिडीयावर या टिप्पणीमुळे रण माजले असून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

काँगेस श्रेष्ठींनी सिद्धू यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधात सातत्याने बोलणे चालविल्यग्नाने राज्यात काँगेसची स्थिती केविलवाणी झाली. काँगेसमधील दुफळी बाहेर आली. आता येथील काँगेस दोन गटांमध्ये विभागली गेली असून दोन्ही गट परस्परांवर शरसंधान करीत आहेत, अशी मल्लिनाथीही आम आदमी पक्षाकडून होत आहे.

काँगेसनेही आम आदमी पक्षावर पलटवार केला. या टिप्पणीतून यग्ना पक्षाची मनोवृत्ती महिलांसंदर्भात किती कोती आणि संकुचित आहे, हे उघड झाले, असे वक्तव्य काँगेस नेत्या अलका लांबा यग्नांनी केले. लांबा प्रथम आम आदमी पक्षात होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्षत्याग करुन काँग्रेस प्रवेश केला आहे.

सिद्धूंनीही चढ्ढा यांच्यावर टीका केली. मानव माकडांपासून उत्क्रांत झाला असे सांगितले जाते. पण ही उत्क्रांनी राघव चढ्ढा यांच्याबाबत अद्याप पूर्ण झालेली नाही, असे त्यांच्या विधानावरुन दिसून येते, अशी बोचरी टिप्पणी सिद्धू यांनी केली.

Related Stories

प्राथमिक शिक्षकाचे बस मध्येच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Anuja Kudatarkar

गुजरात जायंट्सचे नेतृत्व सेहवागकडे

Patil_p

हुतात्मा स्मारकाचे पूर्णतः राष्ट्रीय युद्ध स्मारकाशी एकत्रिकरण

Patil_p

अजित पवारांनी ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट

Archana Banage

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकल इंडस्ट्री ग्लोबल करण्याची वेळ

datta jadhav

मुस्लिम धर्मगुरुंच्या अंत्ययात्रेला जमले 20 हजार लोक

datta jadhav