Tarun Bharat

नववर्षारंभाच्या नावाखाली गैरप्रकार थांबवा

हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

नववर्षारंभाच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या मध्यरात्री प्रेक्षणिय व ऐतिहासिक स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार थांबवावेत, याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपान, धूम्रपान आणि पाटर्य़ा करणे यावर निर्बंध घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

गुरुवारी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी मिलन पवार, प्रणाली पवार, सदानंद मासेकर, सुधीर हेरेकर, ऋषिकेश गुर्जर, प्रसाद हळदणकर आदी उपस्थित
होते.

यंदाच्या वषी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येणार, अशी शक्मयता वर्तवित आहेत. अशावेळी 31 डिसेंबरला पाटर्य़ांच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या होणाऱया अशा कार्यक्रमांवर व गैरप्रकारांवर बंदी घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Related Stories

टिळकवाडीत आणखी दोन उड्डाणपूल होणार

Patil_p

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. वा. पु. गिंडे यांचे निधन

Amit Kulkarni

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर मात करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार?

mithun mane

गवत-झुडपांमध्ये हरवला जलतरण तलाव

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 27 हजार वासरांना लस

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर आज फैसला

Amit Kulkarni