Tarun Bharat

नवाब मलिक ड्रग्ज माफियांचे ब्रँड ॲम्बेसिडर

ऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग :

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट आणि ड्रग्ज माफियांचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ते एनसीबीचे मुंबई झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे यांना वारंवार टार्गेट करत आहेत. त्यावरुन आमदार नितेश राणे यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणे म्हणाले, शिवसेनेची सत्ता असताना समीर वानखेडे या मराठी माणसाला टार्गेट केले जात आहे. मलिकांकडून प्रामाणिक काम करणाऱया वानखेडेंचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जावयाला अटक केली म्हणून मलिकांकडून एनसीबीवर टीका करण्याचा प्रकार सुरू आहे. मलिक पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड ॲम्बेसिडर आहेत.

Related Stories

सावंतवाडी कृषी पर्यवेक्षक करतोय कार्यालयात गैरवर्तन

NIKHIL_N

तपासणी नाक्यांची संख्या वाढवावी!

NIKHIL_N

होडावडे येथे काजू फॅक्टरीच्या शेडमधील गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त

Anuja Kudatarkar

सावंतवाडीत भरवस्तीत चोरटय़ांचा धुडगूस

NIKHIL_N

शिवसेना-भाजप सदस्यांकडून हंगामा

NIKHIL_N

‘सिलिका’ दंडात्मक कारवाईनंतर पुढे काय?

NIKHIL_N
error: Content is protected !!