Tarun Bharat

नवीन आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

अश्विनी वैष्णव यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी ट्विटरला नवीन आयटी नियमांविषयी इशारा दिला आहे. ट्विटरच्या मनमानीवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी हे स्पष्ट केले की, देशाचा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे.

देशातील कायदा सर्वोच्च आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. ट्विटरलाही कायद्याचं पालन करावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वैष्णव हे ओडिशामधून भाजपाचे खासदार आहेत. सध्या त्यांच्याकडे महिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. तसेच ते रेल्वेमंत्रालयाचे प्रभारी आहेत. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. पदाभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं आहे.


दरम्यान, ट्विटरने आज दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की ते आठ आठवड्यांत तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहेत. आयटीच्या नियमांचे पालन करण्यासाठी भारतात संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याचेही ट्विटरने कोर्टाला सांगितले. हे कार्यालय त्यांचे कायमस्वरूपी असणार आहे.

Related Stories

अनन्याच्या बँक खात्याचीही चौकशी

Patil_p

लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण राजकीय हेतूने प्रेरित- खासदार अधीर चौधरी

Abhijeet Khandekar

Budget २०२२ Live: भारतीयांना चीप असणारे पासपोर्ट उपलब्ध होणार

Archana Banage

‘निपाह’चा रिपोर्ट तासाभरात हातात!

datta jadhav

आयएसआय संशयित काश्मीरमधून अटकेत

Patil_p

अंदमान-मणिपूरमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप

Patil_p