Tarun Bharat

नवीन बसपास प्रक्रिया ठप्पच

Advertisements

बसपास प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

सोमवारपासून 9 ते 12 वीपर्यंतच्या ऑफलाईन वर्गांना प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांना बसपास गरजेचा बनला आहे. शहरासह ग्रामीण भागात बसपासच्या माध्यमातून प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र अद्याप नवीन बसपास प्रक्रियेला सुरुवात झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुना बसपास व शुल्क पावती दाखवून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी गतवषी बसपास काढला नाही त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नवीन बसपास प्रकियेला लवकर सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.

दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध व्हायचा. मात्र कोरोनामुळे मागील वर्षापासून बसपासचे कामदेखील विस्कळीत झाले आहे. शिवाय मागीलवर्षी बसपासची प्रक्रिया बदलली होती. दरम्यान विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून ऑनलाईनद्वारे बसपास उपलब्ध करण्यात आले होते. तो बसपास आता 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन बसपास प्रक्रियेविषयी 31 ऑगस्टनंतर निर्णय होण्याची शक्मयता आहे.  गतवषी ऑनलाईन बसपास मिळविताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. मागील वषी कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बराच काळ बंद होती. त्य़ामुळे बसपासच्या कामाला देखील स्थगिती मिळाली. तब्बल 6 महिन्यानंतर नववी ते बारावीपर्यंच्या वर्गांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा ते घर असा प्रवास करण्यासाठी बसपास गरजेचा बनला आहे. गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुना बसपास व शुल्क पावती दाखवून प्रवास करण्याची मुभा दिली आहे.

Related Stories

नामदेव शिंपी समाजवतीने गरजू समाजबांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Patil_p

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

Amit Kulkarni

पावसामुळे उचगाव लक्ष्मी गल्लीत घर कोसळून चार लाखाचे नुकसान

Amit Kulkarni

टिळकवाडी पोलीस स्थानकातर्फे जनजागृती मोहीम

Amit Kulkarni

महापालिका वॉर्ड पुनर्रचना कधी?

Patil_p

ए. जे. स्पोर्ट्स विजयी, आनंद अकादमी-देसाई वारियर्स सामना टाय

Patil_p
error: Content is protected !!