Tarun Bharat

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बेंगळूरमध्ये कर्फ्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बेंगळूर पोलिसांनी सोमवारी शहरात कर्फ्यू लागू केल्याचे जाहीर केले. कर्नाटक सरकारने नवीन वर्षाचे स्वागत साध्य पद्धतीने करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ ते १ जानेवारी २०२१ रोजी बेंगळूर येथे कलम १४४ अंतर्गत (निषिद्ध आदेश) बंदी घातली आहे. सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव सार्वजनिक ठिकाणी जमू नये, असे म्हंटले आहे.

पोलीस आयुक्त पंत यांनी एमजी रोड, चर्च स्ट्रीट, ब्रिगेड रोड, कोरमंगला आणि इंदिरानगर येथे ‘नो-मॅन’ झोन तयार केले जातील आणि केवळ पब, बार आणि रेस्टॉरंट्ससाठी अग्रिम आरक्षण कूपन असलेल्यांना परवानगी देण्यात येईल, असे म्हंटले. कर्नाटक सरकारने नवीन वर्षाच्या उत्सवासाठी सार्वजनिक मेळाव्यास यापूर्वीच १७ डिसेंबर रोजी एका आदेशाद्वारे बंदी घातली होती.

सोमवारी राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई आणि आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेण्यात आले.

Related Stories

धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीकडून 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Amit Kulkarni

बीबीएमपीचे बॅरीकेडवर २० कोटी खर्च

Archana Banage

युकेवरून आलेले प्रवासी १३८ सापडले

Archana Banage

बेळगाव उत्तरच्या एसीबीचे प्रमुख न्यामगौडा यांना राष्ट्रपती पदक

Patil_p

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी पोलीस एसडीपीआयची चौकशी करणार

Archana Banage

आशा कर्मचाऱ्यांची काँग्रेस नेते डी. के. शिवकुमारांनी घेतली भेट

Archana Banage