नवी दिल्ली : फोर्ड इंडियाने आपली नवी इकोस्पोर्ट एसई कार नुकतीच बाजारात दाखल केली आहे. पेट्रोल आणि डिझेल इंधनावरच्या कार्स सादर करण्यात आल्या असून दोन्हींच्या किमती 11 लाख रुपयांच्या घरात असणार आहेत. अमेरिकेतील आणि युरोपमधील डिझाइन तंत्राची जोड सदरच्या गाडीला देण्यात आलेली आहे. वेगळेपण व उत्तम अशा जागतिक स्तरावरच्या डिझाइनच्या कारला ग्राहकांची नेहमीच पसंती दिसून आली आहे. तसा प्रयत्न नव्या इकोस्पोर्ट एसईबाबत करण्यात आला आहे. दिसण्यातला श्रीमंती थाट आणि सुरक्षितता ही दोन वैशिष्टय़े या गाडीच्याबाबतीत सांगितली जात आहेत.


previous post
next post