Tarun Bharat

नवी ऊर्जा घेऊन दौडची सांगता

नवव्या दिवशीच्या दौडला दसऱयाच्या मुहूर्तावर मारुती गल्लीतील मारुती मंदिरापासून प्रारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

तरुणाईला देव, देश व धर्म याविषयी प्रेरित करण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस शिवप्रति÷ानच्या माध्यमातून दुर्गामाता दौड काढली जाते. यावषी कोरोनामुळे प्रातिनिधिक स्वरुपात मोजक्मयाच धारकऱयांच्या उपस्थितीत दौड काढण्यात आली. धारकरी मोजकेच असले तरी या नऊ दिवसांत मिळालेली ऊर्जा पुढील वर्षभराच्या कार्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. हीच ऊर्जा घेऊन यावषीच्या दुर्गामाता दौडची जत्तीमठ येथे सांगता झाली.

नवव्या दिवशीच्या दौडला दसऱयाच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडचा प्रारंभ झाला. खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी चंद्राप्पा यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्ली येथून जत्तीमठ येथे दौडची सांगता झाली. माजी महापौर सरिता पाटील व नगरसेवक संतोष पेडणेकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.

ग्रामीण भागात मिळाला प्रचंड प्रतिसाद

दुर्गामाता दौड ही शहरासोबतच बेळगाव, खानापूर, चिकोडी, बैलहोंगल या तालुक्मयांमध्येही काढली जात आहे. तालुक्मयाच्या ठिकाणी व गावपातळीवर यावषी दुर्गामाता दौडला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईला दिले जाणारे धर्मरक्षणाचे शिक्षण व सुदृढ आरोग्यासाठी केलेली सुरुवात यामुळे प्रतिवषी मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. दोन-तीन गावांना मिळून दुर्गामाता दौड काढली. यामध्ये तरुणाईचा सहभाग सर्वाधिक दिसून आला.  

नागरिकांच्या सहकार्यामुळेच परंपरा कायम

गतवषीप्रमाणेच यावषी कोरोनाचा धोका असल्याने पूर्ण क्षमतेने दौड काढण्यास परवानगी देण्यात आली नाही. कोरोनाचा धोका मोठा असल्याने यावषी केवळ 20 धारकऱयांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरुपात दौड काढण्यात आली. बेळगावच्या नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे परंपरा खंडित होऊ न देता दौड निघाली. पोलीस प्रशासनानेही अतिशय उत्तम नियोजन केले होते. शहरात जरी मोठय़ा प्रमाणात दौड निघाली नसली तरी ग्रामीण भागात मात्र जल्लोषात दौड काढण्यात आल्याचे किरण गावडे यांनी सांगितले.

Related Stories

न्यायालयाच्या आवारात बेशिस्तपणे पार्किंग

Amit Kulkarni

लॉगर्स, गोकाक क्रिकेट क्लब संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगावकरांच्या हक्काची ‘बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस’

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी आर.व्यंकटेशकुमार यांची बदली

Patil_p

रविवारी मांसाहाराला अधिक पसंती

Patil_p

प्रलंबित वसाहत योजना मार्गी लावणार

Amit Kulkarni