Tarun Bharat

नवी दिल्ली : एम्स रुग्णालयात 18 जूनपासून टप्प्याटप्प्यात सुरू होणार ओपीडी सेवा

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. सोमवारी सरकारने अनेक निर्बंधात सूट दिली आहे. या अंतर्गत राज्यातील दुकाने, मॉल आणि हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत. रेस्टॉरंट, पार्लर आणि सलून देखील उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही स्कूल, कॉलेज, स्विमिंग पूलसह स्पा, गार्डन आणि पार्क उघडण्यास बंदी आहे. 


त्यातच आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) मध्ये 18 जूनपासून टप्याटप्याने ओपीडी सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


दरम्यान, नॉन कोविड रुग्ण देखील उपचारासाठी रुग्णालयात येऊ लागले आहेत. खाजगी रुग्णालयात ओपीडी सेवा सुरू आहेच, मात्र सरकारी रुग्णालयात बंद आहे. त्यातच आता दिल्लीतील एम्स रुग्णालयात ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ही सेवा 18 जूनपासून सुरू होणार आहे. रुग्णालयात ही सेवा टप्प्याटप्याने सुरू केली जाणार आहे. 


एम्स प्रशासनाच्या मते, आता अन्य गंभीर आजारांसाठी रुग्णांना आपताकालीन विभागाच्या माध्यमातून दाखल करून घेण्यास सुरुवात केली आहे. एम्समध्ये कोरोना रुग्णांसाठी 300 बेडची व्यवस्था होती. आता पहिल्यांदा काही विभागात ही सेवा सुरू केली जाणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 

Related Stories

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्मगावी रेल्वे प्रवास

Amit Kulkarni

मतदानपूर्व सर्वेक्षणाचे कल भाजपच्या बाजूने

Patil_p

आरबीआयचं डिजिटल चलन येणार

Abhijeet Shinde

“कोरोना कमी झाला या भ्रमात राहू नका”, WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

Abhijeet Shinde

सीमाभागातील कन्नडसक्ती मोडून काढू!

Abhijeet Shinde

इंदोरमध्ये समूह संसर्गाची भीती वाढली

Patil_p
error: Content is protected !!