Tarun Bharat

नवी दिल्ली : लाजपत नगर मार्केटमधील कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशाची राजधानी दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील एका कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सेंट्रल मार्केटमधील केएफसीजवळ कपड्यांच्या शोरूममध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण आग पाहून आसपासच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 


दिल्ली फायर सर्व्हिसचे प्रमुख अतुल गर्ग म्हणाले की, सेंट्रल मार्केटमधील एका शोरुममध्ये आग लागल्याची सूचना आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनस्थळी पाठवल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Related Stories

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विदेशात पाठवू

Patil_p

रशियाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लसीला मंजूरी

Tousif Mujawar

विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरली- उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

डिसीबी बँकेने टेकफिनोमधील हिस्सेदारीचे केले अधिग्रहण

Patil_p

‘मला तर वाटलं…नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील’

Archana Banage

मुख्यमंत्र्यांना ताकीद देऊन केले माफ

Patil_p
error: Content is protected !!