Tarun Bharat

नवी ‘पियाजिओ वन’ इलेक्ट्रीक दुचाकी लवकरच बाजारात

Advertisements

चार्जनंतर 90 किमीचे मायलेजः युवकांना पसंत पडणार : चेतक, आयक्युबला टक्कर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पियाजिओची नवी ‘वन’ ही इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात दाखल होणार असल्याचे समजते. सदरची गाडी सुरूवातीला बिजिंग आंतरराष्ट्रीय मोटर प्रदर्शनात लाँच केली जाणार आहे, असे कळते.

टिकटॉप ऍपवर सदरच्या गाडीचे टीजर सादर करण्यात आले आहे. त्यावरून गाडीचा लुक बघितल्यास सदरची गाडी ही युवकांना समोर ठेऊन डिझाइन करण्यात आल्याचे स्पष्ट होते आहे. महत्त्वाचे म्हणजे सदरची गाडी एकदा चार्ज केल्यावर 90 किमीचे अंतर कापू शकणार आहे. सदरची गाडी भारतीय बाजारात कधी दाखल होणार याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही.

या गाडय़ांशी स्पर्धा

पियाजिओ कंपनी सध्या भारतात व्हेस्पा आणि एप्रिला या गाडय़ांची विक्री करते. नव्या पियाजिओ वनची टक्कर टीव्हीएस आयक्युब, बजाज चेतक आणि ऍथर 450 एक्स सारख्या इलेक्ट्रीक स्कूटरशी होणार आहे. एकंदरच गाडीचा लुक भावणारा आहे.

वैशिष्टय़े

सदरची नवी गाडी वजनाने हलकी असून यात पोर्टेबल लिथीयम आयन बॅटरी आहे. सदरची बॅटरी चार्ज करणे सोपे असून घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज करता येते. एकदा चार्ज केल्यानंतर सदरची गाडी 90 किमीचे अंतर पार करते असा दावा कंपनीने केला आहे.

Related Stories

नवी सेलेरियो लवकरच बाजारात ?

Patil_p

कियाच्या सोनेट कार बुकिंगला उत्तम प्रतिसाद

Omkar B

पेटाने सेल्टॉसला विक्रीत टाकले मागे

Patil_p

7 सीटर एमजी ग्लोस्टर सेव्ही लाँच

Amit Kulkarni

वाहन निर्यात 18.87 टक्क्यांनी घटली

Patil_p

एमजी मोटर्सची ऍस्टर याच महिन्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!