Tarun Bharat

नवी सेलेरियो लवकरच बाजारात ?

मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनच्या काळाचा सर्वच ऑटो कंपन्या मोठय़ा धिटाईने सामना करत आहेत. मारूती सुझुकी कंपनीही आपल्यापरीने स्पर्धेत राहण्यासाठी प्रयत्न करते आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी उत्सवी काळात नवी सेलेरियो बाजारात उतरवण्याची तयार करते आहे, असे समजते.  उत्सवी हंगामात ही ग्राहकांना मोठी भेट असेल, असे सांगितले जात आहे. नवी सेलेरियो येत्या ऑक्टोबरमध्ये भारतीय रस्त्यावर उतरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्सवी काळात कार विक्रीवर जोर देण्यासाठीची तयारी कंपनीने केलेली आहे. उत्सवी हंगामात कार विक्रीला प्रतिसाद मिळण्याची आशा कंपनीने व्यक्त केलीय. नव्या गाडीत अनेक बदल केले जाणार आहेत, असे कळते. या नव्या गाडीची सध्या चाचणी सुरू असल्याचे समजते. पहिल्या गाडीपेक्षा या नव्या गाडीचा आकार अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Related Stories

बीएमडब्ल्यूची ‘220 आय ब्लॅक आय शॅडोव’ कार लाँच

Amit Kulkarni

हिरोच्या एक्सपल्स-200 चे बुकिंग सुरु

Patil_p

मारूती एस-क्रॉस 5 ऑगस्टला बाजारात

Patil_p

बजाज ऑटोचा निर्यातीवर भर

Patil_p

रॉयल इनफिल्डची हिमालयन मोटारसायकल

Patil_p

ओला : 20 लाख दुचाकींचे उत्पादन

Patil_p