Tarun Bharat

नवे बाधित 2030, बळी 52

बाधितांचे प्रमाण किंचित कमी : 1255 जण झाले कोरोनामुक्त सक्रिय बाधित संख्या 24607

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोविडची दुसरी लाट अतिप्रखर बनली असताना बाधित आणि बळींचे अनेक विक्रम करणाऱया कोरोनाने मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी 54 बळी घेतले तर काल रवारी दुसऱया दिवशीही अर्धशतकी संख्या पार करत 52 बळी घेतले. त्यामुळे केवळ दोन दिवसात बळींची संख्या 106 झाली आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे सलग तीन दिवस तीन हजार पार झालेली बाधितांची संख्या रविवारी बऱयाच प्रमाणात कमी होत 2030 एवढी झाली. त्याद्वारे सक्रिय रुग्णसंख्या 24607 वर पोहोचली आहे.

रविवारी दगावलेल्या 52 रुग्णांपैकी 29 गोमेकॉत तर 17 जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. रविवारच्या या बळींसह गेल्या वर्षीपासून आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या 1274 एवढी झाली आहे. गत 24 तासात 1255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या वर्षीपासून आतापर्यंत एकूण 95385 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 69504 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण प्रचंड गतीने घटत असून सध्या ते 72.86 टक्क्यांवर पोहोचले आहे. गत 24 तासात 236 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहेत तर 2067 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.

मडगाव केंद्रात सर्वाधिक रुग्ण

दक्षिण गोव्यातील मडगाव केंद्रात सर्वाधिक 2150 रुग्ण आहेत. त्या खालोखाल कांदोळी केंद्रात 1611, पणजीत 1561, फोंडा 1409, पर्वरीत 1375, कुठ्ठाळीत 1346, म्हापसा 1314, डिचोली 988, कासावली 913, शिवोली 828, सांखळी 800, चिंबल 751, वास्को 711, पेडणे 646, कुडचडे 622, खोर्ली 556, कोलवाळ 544, काणकोण 531, वाळपई 525, धारबांदोडा 523, हळदोणे 512, असे रुग्ण उपचार घेत आहेत. 

केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या

डिचोली 988, सांखळी 800, पेडणे 646, वाळपई 525, म्हापसा 1314, पणजी 1561, हळदोणा 512, बेतकी 394, कांदोळी 1611, कासारवर्णे 118, कोलवाळ 544, खोर्ली 556, चिंबल 751, शिवोली 828, पर्वरी 1375, मये 276, कुडचडे 622, काणकोण 531, मडगाव 2150, वास्को 711, बाळ्ळी 486, कासावली 913, चिंचिणी 305, कुठ्ठाळी 1346, कुडतरी 432, लोटली 448, मडकई 396, केपे 390, सांगे 298, शिरोडा 454, धारबांदोडा 523, फोंडा 1409 व नावेलीत 375 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 19 बाधित सापडले आहेत.

Related Stories

हमीपत्रासाठी विद्यालयांकडून पालकांवर दबाव

Patil_p

वीजखाते यापुढे हरित ऊर्जेवर भर देणार

Patil_p

शांतादुर्गा किटलकरीण संस्थान समितीची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

हलालमुक्त दिवाळी अभियानात सहभागी व्हा

Amit Kulkarni

दुचाक्या चोरणारा जेरबंदः 6.5 लाखांच्या दुचाक्या जप्त

Amit Kulkarni

वारखंडे-फोंडा येथे आज वीरभद्र

Patil_p