Tarun Bharat

नवे साकोर्डा एसईएस स्कूलतर्फे विद्यार्थ्याच्या सोयीसाठी बससेवेचे धाडसी पाऊल

नदी ओलांडण्यासाठी पर्यायी मार्गातून बससेवा : पैकूळ येथील रगाडा नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर उद्भवलेली परिस्थितीवर उपाययोजना

प्रतिनिधी /धारबांदोडा

नवे साकोर्डा येथील एसईएस स्कूलतर्फे पैकुळ सत्तरी येथील विद्यार्थ्यांसाठी नदीतून वाट काढून बससेवा सुरू करण्याचे धाडसी पाऊल पालक व विद्यालय व्यवस्थापनाच्या संमतीने घेतल्याने विद्यार्थ्याना शाळेत सुखरूप पोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना पैकूळ येथील रगडा नदीवरील पुल कोसळल्यामुळे उदभवलेल्या परिस्थतीवर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱया सुमारे तीन किलोमिटरचा अतिरिक्त प्रवासातून सुट मिळाली आहे.

    जुलै 2021 रोजी महापूराच्या अतिवृष्टीमुळे पैकुळ येथील रगडा नदीवरील पूल कोसळला होता. त्यामुळे या गावात जाण्य़ाची रहदारी सोय पुर्णपणे बंद होऊन येथील लोकांना शेजारील भागातील संपर्क तुटला होता. शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱय़ा विद्यार्थ्याची तर मोठी गैरसोय होत होती. पालकांची मागणी होती आपल्या मुलांना नेण्य़ासाठी बस वाहतूक सुरू व्हावी पुल कोसळल्यामुळे या गावातील विद्यार्थी आडवाटेने चालत सुमारे तीन किलोमिटर वाघे सत्तरी येथे यायचे व मग बस पकडून जायचे.

 साकोर्डा शिक्षण संस्था व पालकांच्या संगनमताने महत्वाचा निर्णय

    अचानक उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्याना तर आतोनात हाल व्हायचे होते यामुळे पालक वर्ग तसेच ग्रामस्थ चिंतेत होते. अशावेळी साकोर्डे शिक्षण संस्थेचे या अडचणीवर मात करण्यासाठी पालकांचे म्हणणे एकूण घेतले व दिनांक 24 फेब्रु. रोजी पासून स्कूल बस पाठवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यात आली. यावेळी विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. पालकांनी आपल्या मुलांची गैरसोय दूर करण्यासाठी बस सुरू केल्याबद्दल मुख्याध्यापक व विद्यालय व्यवस्थापनाचे आभार मानले. सदर रस्ता अतियश खडतर असून सुद्धा मुलांची गैरसोय दूर करण्यासाठी संस्थेच्या व्यवस्थापनाने बस पाठविण्याची तयारी दाखविली हे खरोखर अभिनंदनीय आहे असे काही पालकांनी बोलून दाखवले. याकामी मुख्याध्यापक श्री नरेंद्र प्रभू यांनी यासाठी विशेष मार्गदर्शन करून परिश्रम घेतले.

Related Stories

मराठीही गोव्याची राजभाषा व्हावी

Patil_p

जनार्दन भंडारीना काँग्रेस उमेदवारी कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

Amit Kulkarni

मंत्री गोविंद गावडेंना निवेदन

Patil_p

झुआरीनगर चौपदरी महामार्गावर भीषण अपघात

Amit Kulkarni

मंत्री मंडळातील बाबूचा मटका मुख्यमंत्र्यांनी प्रथम बंद करून दाखवावा

Amit Kulkarni

पोळे चेकनाका 1 पर्यंत खुला न केल्यास उग्र आंदोलन

Patil_p