Tarun Bharat

नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा पवार

स्वागताध्यक्षपदी डॉ. जयश्री पाटील यांची निवड 

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 28 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 26 डिसेंबर रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह सांगली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका सुवर्णा पवार यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आहे.

यापूर्वी नारायण सुर्वे, सुरेश भट,मंगेश पाडगावकर, विश्वास पाटील, या सारख्या दिग्गजांनी संमेलनाध्यक्ष पद भूषिवले आहे. सुवर्णा पवार यांनी असे घडले बाबासाहेब, समतेचा दूत, हिकमत, निर्झराराणी, संघर्ष मिलनाचा, स्ञी युध्दारक साविञीबाई फुले, लोकराजा शाहू महाराज असे ग्रंथ प्रकाशित असून त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्ञी प्रश्नांच्या अभ्यासक म्हणून त्या महाराष्ट्राला परिचित आहेत. पवार या बार्शीच्या मूळ रहिवासी असून त्यांच्या निवडीने सर्वञ आनंद व्यक्त होत आहे.

तर स्वागताध्यक्षपदी डॉ. जयश्री पाटील या असणार आहेत. डॉ.पाटील या परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच राज्यपालांच्या हस्ते मेडीक्विन एक्सलन्स पुरस्कारानेही राजभवनमध्ये त्या सन्मानित झालेले आहेत. तसेच उत्तम साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्या, चित्रकार, संगीतकार, अभिनेत्री, जात्यावरील ओव्या, उखाणे, पाळणे यांच्या लेखिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. ‘वेध शब्दांचा’ आणि स्त्रीशक्तीची उत्तुंग भरारी तरी स्त्री भ्रूण हत्या का ? त्यांची ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. संमेलनास राज्यभरातून 200 साहित्यिक उपस्थिती लावणार आहेत. उदघाटन सोहळा, प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

Related Stories

पूर परिस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय राहील – जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली : लॉकडाऊनबाबत दोन दिवसात निर्णय – पालकमंत्री

Abhijeet Shinde

कुर्डुवाडी आगारातील ८१ कर्मचारी कामावर रुजू

Abhijeet Shinde

सांगली : गणेशोत्सवाच्या खर्चातून केली रस्त्याची स्वच्छता

Abhijeet Shinde

बुधगांव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ५४ लांखाचा निधी मंजूर

Abhijeet Shinde

हणमंतराव पवार यांचा सांगलीमध्ये सत्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!