Tarun Bharat

नवोदित शेरिफ संघाचा रियल माद्रिदला धक्का

माद्रिद / वृत्तसंस्था

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सेबॅस्टियन थिलने 90 व्या मिनिटाला केलेल्या विजयी गोलामुळे नवोदित शेरिफ संघाने प्रस्थापित रियल माद्रिदला 2-1 अशा फरकाने पराभवाचा धक्का देत एकच खळबळ उडवून दिली. सॅन्तियागो बर्नेब्यू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत थिलने टॉप कॉर्नरवरुन जबरदस्त फटका लगावत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. शेरिफतर्फे जॅसुर्बेकने 25 व्या तर सेबॅस्टियनने 90 व्या मिनिटाला गोल केले. माद्रिदचा एकमेव गोल करिम बेन्झेमाने 65 व्या मिनिटाला केला.

शेरिफचा संघ या विजयासह गुणतालिकेत ड गटात अव्वलस्थानी राहिला. शेरिफच्या खात्यावर सध्या 6 गुण आहेत. ते माद्रिदपेक्षा 3 गुणांनी आघाडीवर आहेत. यापूर्वी मागील लढतीत शेरिफने शक्तार डॉनेट्स्कचा 2-0 तर माद्रिदने इंटरवर 1-0 असा विजय संपादन केला होता.

Related Stories

आशिष जाखरवर चार वर्षांची बंदी

Patil_p

अविनाश साबळे युगांडात ट्रेनिंग घेणार

Patil_p

श्रीजेश, सविता वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक

Amit Kulkarni

रोमांचक सामन्यात द.आफ्रिकेची 4 धावांची बाजी

Patil_p

टी-20 : न्यूझीलंड-विंडीज आज आमनेसामने

Patil_p

फुटबॉल सम्राट पेले नाबाद 80

Patil_p