बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे करण्यात येत असून कणबर्गी परिसरातील विकासकामे करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. येथील ध. संभाजी चौकात नव्याने हायमास्ट बसविण्यात आला आहे. पण सदर हायमास्ट केवळ आठ दिवस सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर हायमास्ट बंद ठेवण्यात आल्याने चौकात अंधार पसरला आहे. कणबर्गी परिसरातील रस्त्यांचा विकास आणि गटारींचे बांधकाम करण्यात आले आहे. ध. संभाजी चौकात हायमास्ट उभारण्यात आला आहे. येथील चौकाच्या मध्यभागी हायमास्ट उभारण्यात येत असताना नागरिकांनी विरोध केला होता. रस्त्याच्या मध्यभागी उभारण्याऐवजी रस्त्याच्या बाजूला उभारण्याची मागणी करण्यात आली होती. पण नागरिकांच्या मागणीकडे कानाडोळा करून रस्त्याच्या मध्यभागी हायमास्ट उभारण्यात आला आहे. नागरिकांचा विरोध झुगारून हायमास्ट उभारण्यात आला, पण हायमास्ट बंद ठेवण्यात आला आहे. सदर हायमास्ट उभारण्यात आल्यानंतर आठ दिवस सुरू ठेवण्यात आला. पण त्यानंतर सदर तो बंद ठेवण्यात आला आहे. नव्याचे नऊ दिवस… या म्हणीप्रमाणे सदर हायमास्ट महिन्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी चौकात अंधार पसरला आहे. त्यामुळे हायमास्ट बसविण्याचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सदर हायमास्ट सुरू करून अंधार दूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.


previous post