Tarun Bharat

नव्याने 15 पॉझिटिव्ह, 35 कोरोनामुक्त

जिल्हय़ात एकूण 4 हजार 353 जण कोरोना मुक्त : कोरोना सक्रिय 470

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱया रुग्णांची संख्या वाढली आहे. मंगळवारी 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 35 रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. 500 च्या खाली सक्रिय रुग्ण संख्या आली असून सद्यस्थितीत 470 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नव्याने 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 950 झाली आहे. तर 35 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आतापर्यंत 4 हजार 353 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत 127 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.

जिल्हय़ातील सद्यस्थिती : नवीन पॉझिटिव्ह रुग्ण – 15, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण – 470, कोरोनामुक्त झालेले रुग्ण – 4,353, एकूण मृत रुग्ण – 127, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 4,950, पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण- तीन.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 330, दोडामार्ग – 247, कणकवली –  1565, कुडाळ – 1129, मालवण – 409, सावंतवाडी  – 655, वैभववाडी – 137, वेंगुर्ले – 465, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 13.

तालुकानिहाय कोरोना सक्रिय रुग्ण : देवगड – 32, दोडामार्ग – 37,  कणकवली – 137,  कुडाळ – 98,  मालवण – 32, सावंतवाडी – 56,  वैभववाडी – दोन,  वेंगुर्ले – 76.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू : देवगड – आठ, दोडामार्ग – दोन, कणकवली – 29, कुडाळ – 25, मालवण – 14, सावंतवाडी – 31, वैभववाडी – सात,                       वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.

आतापर्यंतचे कोरोना तपासणी अहवाल : आरटीपीसीआर टेस्ट – तपासलेले मंगळवारचे नमुने 38 व एकूण नमुने 20,045. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 3557. ऍन्टीजेन टेस्ट – मंगळवारचे नमुने 119 व एकूण नमुने 14,243. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 1513, पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात – तीन, ऑक्सिजनवर – तीन.

Related Stories

मळगांव घाटीतील मोरीचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर

Anuja Kudatarkar

उसने पैशाच्या वादातून प्रौढाचा कुऱहाडीने खून

Patil_p

भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बुद्ध पौर्णिमा साजरी

Anuja Kudatarkar

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर

NIKHIL_N

विमानकोंडीमुळे रत्नागिरीचा अथर्व अडकला सिंगापूरात…!

tarunbharat

पश्चिम भारतातील दुसरा ‘शीप ब्रेकींग प्रकल्प रत्नागिरीत

Patil_p