Tarun Bharat

नव्या आमदारांसाठी विधानसभेची तयारी सुरू

2 मे रोजी होणार मतमोजणी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. निकाल जाहीर होताच पश्चिम बंगाल विधानसभेत नव्या आमदारांचा शपथविधी सुरू होईल. याचमुळे मंदगतीने विधानसभेतील तयारी सुरू झाली आहे. निवडणूक जिंकलेल्या प्रतिनिधींना विधानसभेत एक अर्ज भरावा लागतो. सध्या या अर्जाची छपाई जवळपास होत आली आहे.

2 मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर स्थिती कशी राहते यावर विधानसभेच्या अधिकाऱयांपासून कर्मचाऱयांची नजर लागून राहिली आहे. कारण कोरोना संक्रमणाच्या दुसऱया लाटेत देशभरात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे संकट बंगालमध्येही वाढत चालले आहे. याचमुळे स्थिती ओळखून निर्णय घेण्याचा विचार विधानसभा प्रशासनाने चालविला आहे.

कोरोना संकटामुळे 294 आमदारांचा एकाचवेळी शपथविधी होणे शक्य नाही. याचमुळे या समस्येवर पर्यायी पद्धतीने तोडगा काढावा लागणार आहे.  विधानसभेचा सर्वात अनुभवी सदस्य आमदारांना प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ देतो. 16 व्या विधानसभेचे अध्यक्ष विमान बंडोपाध्याय हे वकील आणि बारुईपूर पश्चिमचे आमदार आहेत. याचमुळे त्यांचे निर्देश देखील निर्णय घेताना मिळविणे विधानसभा अधिकाऱयांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

सरकार स्थापन करणाऱया राजकीय पक्षाचा निर्णय याप्रकरणी सर्वात महत्त्वाचा आहे. प्रोटेम स्पीकर कोण असेल किंवा पुढील अध्यक्ष कोण असेल याचे संकेत प्रशासनाला दिले जातात. या दिशेने हिरवा झेंडा मिळताच विधानसभेचे अधिकारी कामाला वेग देतात. याचमुळे या प्रकरणी तयारी सुरू केली असली तरीही निकालाच्या घोषणेनंतरच सर्व निर्णय घेतले जाऊ शकतात.

Related Stories

जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याला कंठस्नान

Patil_p

ब्रिटनहून येणाऱया विमानांवर बंदी

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वृद्धी

Patil_p

स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद

Patil_p

रक्त गोठावणाऱ्या थंडीत 17 हजार फूट उंचीवर फडकावला तिरंगा

Archana Banage

राजनाथसिंगांकडून लडाख परिस्थितीचा आढावा

Patil_p