Tarun Bharat

नव्या कोरोनापासून बचावासाठी वडगावात मारुतीला साकडे

प्रतिनिधी/ बेळगाव

बाजार गल्ली, वडगाव येथील दक्षिणाभिमुख मारुतीला शनिवार दि. 26 रोजी महारुदाभिषेक करण्यात आला. नव्या अवतारातील कोरोनापासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी मारुतीरायाला साकडे घालण्यात आले.

पुजारी बद्रीनाथ कुलकर्णी, हभप वैजनाथ उच्चुकर यांनी रुईच्या पानांवर देशाचे नाव लिहून समस्त देशवासियांचे रक्षण व्हावे यासाठी पूजेचे आयोजन केले होते. यावेळी मंदिराचे ट्रस्टी अक्षय पिळणकर व इतर भक्तजन उपस्थित होते. अभिषेकानंतर भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Related Stories

‘दो आँखें बारह हाथ’ उतरतेय प्रत्यक्षात!

Amit Kulkarni

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही!

Amit Kulkarni

इनोक्हा चोरणारी हायटेक टोळी सक्रिय

Patil_p

‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ स्पर्धेला उद्यापासून सुरुवात

Amit Kulkarni

आमदारांच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

Patil_p

धारवाडजवळ भीषण अपघातात चार ठार

Patil_p