Tarun Bharat

नव्या नियमामुळे सायना, कश्यप अडचणीत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांमुळे भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप व सायना नेहवाल अडचणीत आले असून पुढे काय करावे या विचारात ते पडले आहेत. दोघेही ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभूत झाले असल्याने बाहेर पडले आहेत. पण त्यांचे भारतात परत येणे नव्या नियमावलीमुळे कठीण होऊ बसले आहे.

या संदर्भात गोंधळात सापडलेल्या कश्यपने आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना ट्विटवर संदेश पाठवून आपली अडचण व्यक्त केली आहे. ‘आम्ही बर्मिंगहममध्ये स्पर्धेत भाग घेण्यास आलो आहोत. तुम्ही जारी केलेल्या नव्या नियमावलीमुळे आमची स्थिती खूपच कठीण झाली असून या संदर्भात आम्हाला तुमच्याशी बोलू इच्छितो,’ असे त्याने या संदेशात म्हटले असून सायना, किदाम्बी श्रीकांत, प्रणव चोप्रा, सिक्की रेड्डी यांची नावेही त्याने त्यात जोडली आहेत.

बुधवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोना साथी संदर्भात नव्या सूचना जाहीर केल्या असून ‘15 फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांतून येणाऱया किंवा भेट देऊन आलेल्या भारतासह कुठल्याही नागरिकांना किमान 14 दिवस विलगीकरण कक्षात वास्तव्य करावे लागेल,’ असे त्यात म्हटले आहे. वरील भारतीय बॅडमिंटनपटूंनी स्पेनमधील बार्सिलोना ओपन स्पर्धेत फेब्रुवारीमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे भारतात येण्याबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या सूचनेनुसार 14 दिवस विलगीकरण कक्षात वास्तव्य केल्यास सायना व कश्यप यांना दोन आठवडे तेथे रहावे लागेल. यामुळे ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जबर फटका बसणार आहे.

Related Stories

पाक सुपर लीग स्पर्धेचे यजमानपद अबुधाबीकडे

Patil_p

19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आजपासून

Patil_p

मनिका बात्राचे ऐतिहासिक यश

Patil_p

माजी फुटबॉलपटू सेंट जॉन कालवश

Patil_p

कतारमध्ये अद्ययावत फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन

Patil_p

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

Patil_p