Tarun Bharat

नव्या नियमावलीविरोधात व्हॉट्सॲप दिल्ली उच्च न्यायालयात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

व्हॉट्सॲपने भारत सरकारविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.देशात आजपासून लागू होणाऱ्या नवीन डिजिटल नियमावलीवर बंदी घालावी, अन्यथा हे नवीन नियम वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षा खंडित करण्यास भाग पडतील, असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे.

सोशल मीडियावरील भारत सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे भारताच्या घटनेनुसार वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचे उल्लंघन करतात. कारण नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रथम पोस्ट केलेल्या किंवा सामायिक केलेल्या वापरकर्त्यांची ओळख पटवणे आवश्यक आहे.

काही चूक झाली तर सरकारच्या तक्रारीनंतर वापरकर्त्यावर नियमांनुसार कारवाई करता येईल. व्हॉट्सॲप प्लॅटफॉर्म एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहे, त्यामुळे कायद्याचे पालन करण्यासाठी व्हॉट्सॲपला हे एन्क्रिप्शन मोडावे लागेल. ज्यामुळे व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येईल, असेेेही व्हॉट्सॲपने न्यायालयात अपील केले आहे. व्हॉट्सॲपचे भारतात जवळपास 55 कोटी वापरकर्ते आहेत.

Related Stories

बॉम्बच्या इशाऱयानंतर इंडिगो विमानाचे लॅण्डिंग

Patil_p

धक्कादायक : ‘त्या’ दहशतवाद्यांना करायचे होते १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट

Archana Banage

भारत हरित हायड्रोजनचा सर्वात स्वत उत्पादक हेऊ शकतो

Patil_p

संततधार पावसाचा उत्तर भारताला दणका

Amit Kulkarni

‘अदानी’ प्रकरणी देशव्यापी निदर्शने करणार काँग्रेस

Patil_p

कोरोना : पंजाबमध्ये 210 नवे रुग्ण; 12 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar