Tarun Bharat

नव्या फॉर्च्यूनर गाडीच्या बुकिंगला प्रतिसाद

मुंबई

जपानमधील कार निर्माती कंपनी टोयोटाने नवी फॉर्च्यूनर गाडी भारतीय बाजारात सादर केली आहे. सदरच्या गाडीसाठी पाच हजार जणांनी बुकिंग केले असल्याचे टोयोटाकडून सांगण्यात आले.  टोयोटा किर्लोस्करने फॉर्च्यूनरच्या बुकिंगला प्रारंभ केल्यानंतर जवळपास पाच हजार जणांनी गाडी घेण्यासंदर्भात बुकिंग केले असल्याचे समजते. कंपनीने सदरच्या  गाडीचा पुरवठा करण्याचे नियोजन विपेत्यांच्या माध्यमातून सुरू केले आहे. सुधारीत फॉर्च्यूनर गाडी आणि लिजेंडर या गाडीसाठी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात चौकशी होताना दिसली. गाडीसंदर्भात सर्व ती माहिती कंपनीने ग्राहकांना योग्य पद्धतीने पुरवली आहे. ग्राहकांना नव्या सुव्ह गटातील गाडीचा अनुभव लवकरात लवकर घेता यावा यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. टोयोटाचा सुव्ह गटातील बाजारातील वाटा 53 टक्के इतका असल्याचे समजते. बोल्ड स्टाईल आणि आधुनिक सुविधांमुळे ही फॉर्च्यूनर गाडी अनेकांच्या पसंतीची राहिली आहे.  ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताच असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

टीव्हीएसची नवी स्कूटर सादर

Patil_p

ओप्पो इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत

Patil_p

मर्सीडिझ-बेंझकडून किंमती वाढवण्याचे संकेत

Patil_p

फॉक्सकॉनचा कारखाना पुन्हा सुरू होणार

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूची ‘एस 1000 आर’ दुचाकी बाजारात

Patil_p

‘बजाज चेतक’ला होणार उशीर ?

Patil_p