Tarun Bharat

नव्या रुग्णांमध्ये केरळचेच 51 टक्के

देशाने नोंदविली पाच महिन्यातील सर्वात कमी संख्या

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे नवे 28,204 रुग्ण आढळले असून ही गेल्या पाच महिन्यांमधील सर्वात कमी संख्या आहे. याच कालावधीत 373 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. बहुतेक राज्यांमध्ये आता शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठा पूर्णतः उघडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या पूर्ण आठवडय़ाचा विचार करता, देशात आढळलेल्या एकंदर रुग्णांपैकी 51.1 टक्के रुग्ण केवळ केरळमध्ये सापडले आहेत, असे दिसून येते.

देशाच्या 37 जिल्हय़ांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग अद्यापही आठवडय़ाला 10 टक्के असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दुसऱया लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे लोकांनी कोरोनाविषयीचे नियम, मास्कचा उपयोग आणि सामाजिक अंतराचा नियम यांचे कसोशीने पालन करावयास हवे, असे सांगण्यात आले.

कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण आता 97.45 टक्क्यांवर पोहचले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,88,508 इतकी असून त्यापैकी 1 लाखांहून अधिक केवळ केरळ राज्यातील आहेत. आतापर्यंत या संसर्गामुळे देशात 4,28,682 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 3,19,98,158 इतकी आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Related Stories

कार्यकाळातील कामगिरीसंबंधी समाधानी

Patil_p

दुसऱया टप्प्यातील अनलॉकचा निर्णय दोन दिवसांत

Patil_p

संसदेबाहेर शिरोमणी अकाली दलाचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन

Archana Banage

झोपेतून जागे व्हा आणि कोरोना समस्यांचा सामना करा – केंद्राला आयएमएने सुनावलं

Archana Banage

लष्करातील ‘झूम’ श्वानही हुतात्मा

Amit Kulkarni

सपा नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

datta jadhav