Tarun Bharat

नव्या व्हेरियंट विरोधात मास्कच उपयुक्त

Advertisements

डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिकांचा सल्ला – गर्दीत जाणे जाळा

वृत्तसंस्था/ जीनिव्हा

कोरोनाचा नवा व्हेरियंट हा भारतात कोरोनासंबंधी योग्य वर्तन जाणून घेण्यासाठी ‘वेक अप कॉल’ असु शकतो असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी काढले आहेत. शक्य ती खबरदारी बाळगण्यासह मास्क वापरण्यावर भर देण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या विरोधात मास्कच सर्वात मोठे अस्त्र आहे. मास्कच कोरोनापासून लोकांना वाचविणार आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या विरोधातील युद्धात प्रौढांचे लसीकरण, सामूहिक सोहळय़ांपासून अंतर आणि रुग्णवाढीवर बारकाईने नजर ठेवण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत अधिक संक्रामक असू शकतो. पण अद्याप अधिकृतपणे काहीच सांगितले जाऊ शकत नाही. पुढील काही दिवसांमध्ये यासंबंधी अधिक माहिती प्राप्त करता येईल. नव्या व्हेरियंटसंबंधी अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आम्हाला अधिक अध्ययन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

datta jadhav

7.0 तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला मेक्सिको

Patil_p

ड्रीम होममधील विवाहाचे स्वप्न राहिले अधुरे

Patil_p

पेंटागॉननजीक बेछूट गोळीबार, अधिकाऱयाचा मृत्यू

Patil_p

केवळ 12 दिवसातच पामेलाचा विवाह संपुष्टात

Patil_p

जर्मनीच्या नेत्या अँजेला मर्केल निवृत्त

Patil_p
error: Content is protected !!