Tarun Bharat

नांदणीत एटीएम फोडण्‍याचा प्रयत्‍न; अवघ्या चार तासात आरोपी जेरबंद

प्रतिनिधी / शिरोळ

नांदणी (ता. शिरोळ) येथील बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम फोडणा-या संशयीत आरोपी जमीर आबालाल सादुले याला शिरोळ पोलिसांनी अवघ्या चार तासात जमीर सादुले (वर्ष 22 नांदणी, ता. शिरोळ) यास जेरबंद केले. संशयीताने गुन्‍हयात वापरलेले लोखंडी कुदळ व लोखंडी एक्‍साकटर जप्‍त करण्यात आले आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदणी ता. शिरोळ येथे बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम मशीन आहे. मगळवारी पहाटे अज्ञात चोरट्याने एटीएम फोडण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र त्‍याच्‍या हाती काही लागले नाही. एटीएमचे मात्र सुमारे 60 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बँकेचे प्रदीप प्रतापराव निंबाळकर (आसगोळी , ता. चंदगड) यांनी मंगळवारी सकाळी शिरोळ पोलिसांत फिर्याद देण्‍यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. कुंभार आणि घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हे शोध पथकास तपासाच्या सूचना दिल्या. गुन्‍हेशोध पथकाने सीसीटीव्‍ही फुटेजच्‍या माध्‍यमातून तपास यंत्रणा राबविली. यामध्‍ये सादुले हा संशयीत असल्‍याचे पुढे आले. शिवाय गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्‍यानंतर संशयीत हा धरणगुत्‍ती गावच्‍या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्‍याचा पाठलाग करीत असताना संशयित आरोपी जमीर सादुले ऊसाच्या फडातून पळू लागला  पोलीसानी त्याचा पाठलाग करून करुन त्याला पकडले. त्‍याने गुन्‍हयाची कबुली दिली असून या कारवाईत पोलीस हेडकॉन्‍स्‍टेबल ज्ञानेश्वर सानप, निलेश कांबळे, सागर खाडे, अमित पवार, हनुमंत माळी, ताहीर मुल्‍ला यांनी सहभाग घेतला.

Related Stories

..अन्यथा उसाचे कांडे तोडू देणार नाही

Archana Banage

जयसिंगपूर येथील तीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

Abhijeet Khandekar

शेतकरी कायद्या विरोधात काँग्रेसतर्फे ५ नोव्हेंबरला भव्य ट्रॅक्टर रॅली : सतेज पाटील

Archana Banage

कोल्हापूर : खोकुर्ले येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

Archana Banage

जाणीव नसलेल्या यादीमध्ये ‘बंटी पाटील’ टॉपला!

Abhijeet Khandekar

बावेली येथील धबधबा ठरतोय लक्षवेधी

Archana Banage