Tarun Bharat

नांदेडमधील आश्रमात साधुसह सेवकाची हत्या

Advertisements

ऑनलाईन टीम / नांदेड : 

नांदेडच्या उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील आश्रमात एका साधूची आणि त्यांच्या सेवकाची माथेफिरूने गळा दाबून हत्या केली. सदगुरू शिवाचार्य नागठणकर आश्रमात मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली.

शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ असे खून झालेल्या महाराजांचे नाव आहे तर भगवान शिंदे असे त्यांच्या सेवकांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागठाणा बु. येथील एका माथेफिरू तरुणाने मध्यरात्री 1वाजण्याच्या सुमारास मठात प्रवेश केला. त्यानंतर माथेफिरूने मठातील सर्व ऐवज लुटला. त्यानंतर महाराजांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर माथेफिरु महाराजांच्या गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, शेजारील लोक जागे झाल्याने त्याने मठातून पळ काढला. त्यानंतर मठाच्या बाथरूममध्ये महाराजांचा सेवक भगवान शिंदे यांचा मृतदेह आढळला. 

दरम्यान, मठातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने हे खून चोरीला विरोध केल्याने झाले असावेत, पोलिसांनी प्राथमिक अंदाजात म्हटले आहे.

Related Stories

‘रेमडेसिविर’च्या दरात मोठी कपात

Patil_p

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम

Abhijeet Shinde

जळगावात 1500 किलो गांजा जप्त; मुंबई NCB ची कारवाई

datta jadhav

“हिरेन हत्येचे पुरावे नष्ट करण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र”

Abhijeet Shinde

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

Abhijeet Shinde

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, 177 प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना

Rohan_P
error: Content is protected !!