Tarun Bharat

नांद्रे तलाठयाचा मनमानी कारभार, ग्रामपंचायत सदस्याला दिली जिवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी / सांगली

नांद्रेता. मिरज येथील पंजाब गणपती माने यांनी दि.26/12/2019 व 1/1/2020 रोजी दस्त अजासोबत जोडून दाखल केलेला होता. तलाठी यांनी माने यांची नोंद न घालने, नाव न नोंदवने हे जाणिवपूवक प्रलंबित ठेवल्याने माने यांनी आपल्या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य अरविद कुरणे यांना विनंती केली, माझे नोंदिचे काम न झाल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी अनेक अडथळे येत असून माझे प्रचंड नुकसाण होत आहे, तरी आपण तलाठ्यांना या कामाबाबत विनंती करावी.

त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरणे माने यांना सोबत घेऊन नांद्रे गावकामगार महावीर सासणे यांना विनंती केली आण्णासाहेब या गरीब मागासवर्गीयाचे काम लवकर करू द्यावे. त्यावेळी तलाठी सासणे हे मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्याच्या अंगार धावत जाऊन तू कोण मला विचारणार असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत तलाठी कार्यालयातुन हाकलून लावले. असा प्रकार घडला आसल्याने मागासवर्गीय समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यावेळी तरूण भारतशी बोलताना ग्रा.पं.सदस्य अरविंद कुरणे यांनी वरील माहिती दिली. वरील घटनेचे निवेदन जिल्हाअधिकारी यांनी देण्यात आले आसून, मुंख्यमंञी, महसूलमंञी, जिल्हापोलीस प्रमुख,व आदि संबंधीतांना ही निवेदन देण्यात आले असुन संबंधीत सासणे तलाठी यांची चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्रबुध्द रिपब्लिकन पाटी व समाज बांधवाच्यावतीने करण्यात आली आहे.

सदरच्या प्रकरणात 20 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास मिरज प्रांत कार्यालयासमोर तीव्र अंदोलन करण्यात येणार असून या अंदोलनात प्रबुध्द रिब्लिकन पाटी व समाज बांधवाच्यावतीने दोनशे ते तीनशे लोक या अंदोलनात सहभागी होणार असून जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत अंदोलन सुरू ठेऊन त्यांची तीव्रता वाढवणार आसल्याचे मागसवर्गीय ग्रा.पं.सदस्य अरविंद कुरणे यांनी सांगीतले.

Related Stories

सांगली : 200 किलोमीटर सायकलिंग उपक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद

Archana Banage

सांगली : रेल्वे ‘ट्रॅकवर’ पाटबंधारे ‘धारेवर’

Archana Banage

बेदाणे @ ३६५ रुपये प्रतिकिलो

Archana Banage

सांगली : सांगाव येथे ग्रामीण पत्रकारांची कार्यशाळा संपन्न

Archana Banage

Sangli : महापालिकेकडून सुंदरनगरमधील वारांगणांची आरोग्य तपासणी ; 100 महिलांनी घेतला सहभाग

Abhijeet Khandekar

खड्डेमुक्त मिरज शहरासाठी आम आदमीच्या कार्यकर्त्यांचे श्रमदान

Archana Banage