Tarun Bharat

नांद्रेयातील तरूणाई रोज दीड जी.बी. संपवण्यात बिझी

प्रतिनिधी / नांद्रे

नांद्रे.ता. मिरज येथील बहुसंख्य तरूणाई नेटवरील दीड जी.बी.संपवण्यात बिझी असल्याने त्या तरूणाईचं भविष्य उध्दवस्त करायला दीड जी.बी. कारणीभूत ठरू शकते. गावात इंटरनेटच्या सकारात्मक वापरराबद्दल अज्ञान असणाऱ्या वेळीच सावध होणे गरजेचे आहे. आजची तरूणाई काय काम करायचं यापेक्षा एका दिवसात दीड जी.बी. नेट पॅक कस संपवायच यातच गुंतून पडली आहे. त्यामुळे आजची तरूणाई भविष्याचा काहीच विचार करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दीड जी.बी.मुळे दररोज दीड जी.बी संपवण्याचाच विचार ते करत आसतात.

हातात पुस्तक नाही ,वुत्तपत्रे नाहीत, त्यामुळे वाचन शून्य. लेखन तर खूपच लांबची गोष्ट, गुड मॉर्ऩिंग, हाय, हॅलो, हॅप्पी बडे, हॅप्पी मॅरेज, गुड नाईट, चॅटींग, टिंगल टवाळी, आश्लील चित्रफिती, बिन कामाचे उद्योग करत बसणे हा एकमेव उद्योग दीड जी.बी.ने वाढला आहे. मात्र येणारा काळ हा फार भयंकर आहे. शिक्षण कमी आसल्यामुळे नोकरी नाही,कोणतेही कौशल्य नसल्यांने धंदा करता येत नाही.

हा दीड जी.बी.कधी आपल्या जीवावर उठेल व आयुष्य बरबाद करेल सांगता येत नाही. नेट चा वापर हा जेवणाबरोबर लोणचं जसे लाऊन खातो तसं वापर हवा नाहीतर मानसिक रूग्ण ही व्हायला वेळ लागणार नाही. तरूण मित्रांनो नेटच्या मागे न लागता, आपल्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष द्या. जीवनाची रेस खूप रिस्की होत चालली आहे. दीड जी.बी. संपवता संपवता आपण कधी संपून जाऊ हे आपणाला कळणार देखिल नाही. फाटकी ,तुटकी कपडे घालून तुमचा सांभाळ करणाऱ्या आपल्या आई बाबाची लाज राखा.

दररोज लाखो, करोडो रूपये कमविणारा सुपर स्टार अमिर खानने मोबाईल वापरने बंद केल आहे. आम्ही तुम्हीतर फाटकी, तुटकी माणसं आहोत, विचार करा. व दीड जी.बी.नेट पॅक वापरणे बंद करा.

Related Stories

पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Archana Banage

पेठनाका येथे कोकेन तस्कर नायजेरियन तरूण जेरबंद

Abhijeet Khandekar

मिरजेत नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या मेडिकलवर कारवाई

Archana Banage

संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा तपास करून कारवाई करणार- जयंत पाटील

Archana Banage

सांगली : ४० रुग्णांसाठी दोन लाख लोकांना वेठीस धरू नका

Archana Banage

सांगली जिल्ह्यात नवे 21 रूग्ण तर 35 कोरोनामुक्त

Archana Banage