Tarun Bharat

नाक्यावरच गोलगोल प्रवास

प्रतिनिधी/ सातारा

पोवई नाक्यावर बऱयापैकी ग्रेड सेपरेटरचे काम उरकत आले आहे, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाहतूकीचे मार्गही दररोज बदल करण्यात येतो. शहर वाहतूक शाखेकडून दररोज त्या सुचनेत बदल करण्यात येतो. मात्र, घाईत असलेले साताकर आपली वाहने तशीच दामटतात. गुरुवार आणि रविवारी साताऱयाचा बाजार असतो. मंडईसह साताऱयात गर्दी असते. पोवई नाक्यावर पोवई नाका ते तहसील कार्यालय या दरम्यान वाहतूकीचा प्रश्न एवढा बिकट झाला आहे. की दिसला मोकळा रस्ता की दामट गाडी आणि घाईमुळे वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नाक्यावरचा प्रवास नको र बाबा असाच सुर उमटू लागला आहे.

सुमारे गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले पोवई नाक्यावरच्या ग्रेड सेपरेटरचे काम अंतिम टप्यात आले आहे. काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येते. परंतु तोपर्यंत वाहतूकीचा प्रश्न नेहमीचाच बिकट बनला आहे. शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्याकडून सातत्याने येथील वाहतूकीत बदल केले जावून वाहतुक पूर्ववत सुरळीत करण्याच्त्प्रयत्न केला जातो. त्यामध्ये पोवई नाका ते तहसील कार्यालय हे अंतर जाण्याकरता किमान दहा मिनिटे लागू लागली आहेत. एवढी कोंडी निर्माण होवू लागली आहे. अजूनही वाहतूकीला रस्ते खुले केले नसले तरीही वाहनधारक दिसली वाट की तेथूनच आपली वाहने रेमटण्याचा प्रकार सुरु असतो. ग्रेड सेपरेटरच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर नुकतेच डांबर टाकण्यात आले आहे. रविवारी तहसील कार्यालयाच्या बाजूला डांबर टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत होती. तर त्याच्या विरोध बाजूला कासट मार्केटकडून येणारी वाहने, स्टॅण्डकडून जाणारी वाहने तेथेच येत असल्याने नेमका कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. रविवारी तर हा कोंडी फुटत नसल्याने मंडईतून दुचाकी व रिक्षा चालकांना आपली वाहने काढावी लागली. त्यामुळे नाक्यावर गोल गोल प्रवास होत होत होता.

लगेच वाहतूक सुरळीत झाली

इतर दिवशी रस्ता रहदारीचा असतो. त्यामुळे रविवारी डांबर टाकण्याचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले होते. सकाळी थोडीशी वाहतुकीची समस्या झाली होती. परंतु लगेच वाहतुक सुरळीत झाली. काहीच अडचण येणार नाही.

विठ्ठल शेलार शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक

नियम पाळलेच पाहिजेत

घाई करुन चालणार नाही. रस्त्याचे काम सुरु आहे. तेथून नियमानुसार गाडी चालवली गेली पाहिजे. कोणताही वाहनधारक असुद्या. त्याने रस्त्याचे, परिस्थितीचे नियमाचे पालन केले पाहिजे. त्याच्याबरोबरच इतरांना त्रास होणार नाही. वाहतूक सुरळीत होईल एवढे एकच मला वाटते.

मधुकर शेंबडे वाहतुक मित्र

 

Related Stories

शहर पोलीस ठाण्याच्या वतीने बेवारस गाडय़ाचा लिलाव

Patil_p

लालमहाल चित्रीकरणावरून उदयनराजे संतापले, म्हणाले…

datta jadhav

जनशक्ती, लोकशाहीला विकासापेक्षा अहंपणा महत्वाचा

Amit Kulkarni

जंगली मांजरीच्या नखांची तस्करी करणाऱया दोघांना अटक

Patil_p

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यास दमदाटी

Archana Banage

शैक्षणिक फी साठी पालकांची अडवणूक करू नये-उदयनराजे

Amit Kulkarni